लोणावळा - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, एसआरपी, मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांचे स्वागत करताना मतदार.
लोणावळा - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, एसआरपी, मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांचे स्वागत करताना मतदार. 
पुणे

Vidhan Sabha 2019 : मावळ : अडीअडचणींत जनतेसोबत राहीन - सुनील शेळके

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : लोणावळा - ‘मावळातील जनतेच्या प्रत्येक अडीअडचणींत मी सदैव तुमच्याबरोबर राहीन. लोणावळा येथील सर्वसामान्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय सुरू करण्यासाठी मी वचनबद्ध आहे,’’ अशी ग्वाही मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी दिली.

लोणावळा परिसरातील भुशी, रामनगर, खोंडगेवाडी, सिद्धार्थनगरमध्ये शेळके यांनी मंगळवारी (ता. १५) सकाळी प्रचार फेरी काढली. सर्व ठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत झाले. लोणावळ्यात फुलांची उधळण करण्यात आली.

औक्षणासाठी रांगा होत्या. विविध संस्था-संघटनांनी शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. भुशी येथे सुरेश मराठे, स्वप्नील मराठे, योगेश येवले, संभाजी मराठे, उमेश मराठे, सागर मराठे, संतोष मराठे, सचिन मराठे, रूपेश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. 

मावळच्या जनतेने आपल्याला एक संधी द्यावी, असे आवाहन शेळके यांनी या वेळी केले. 

रामनगरमध्ये एसआरपीचे अध्यक्ष अजय रोकडे, सुनील बेंगळे, अशोक शिंदे, सुरेश शिंदे, प्रदीप कांबळे, कपिल रोकडे, मंगेश गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी झाले होते. खोंडगेवाडीत सुधीर कदम, अरविंद कदम, संजय दिघे तसेच हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करून मिरवणूक काढली. सिद्धार्थनगर येथील मातंग समाज तसेच गावठाण येथील रोहिदास तरुण मंडळ व संत रोहिदास महिला मंडळाने शेळके यांना पाठिंबा जाहीर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT