पुणे - नव्याने शाळेची वाट धरलेली लहान मुले अभ्यासाच्या पायाभूत संकल्पना, अंक आणि अक्षरे समजून घेण्यात गुंतले असताना, पुण्याच्या हडपसर भागातील बिल्लाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल (बीएचआयएस) मधील ५ वर्षीय माहिका पोतनीस (Mahika Potnis) हिने पाच मिनिटांच्या अल्पावधीत श्लोक पठणाचा (Shlok Pathan) विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Record) नोंदवला आहे. (Mahika Potnis Shlok Pathan Record in India Book of Record)
माहिकाला ही प्रेरणा तिची आई सारिका यांच्यापासून मिळाली. वयाच्या चार वर्षांपासून माहिकाने नियमितपणे पवित्र धर्मग्रंथातील अध्यायांच्या पाठांतराला सुरवात केली. ते पाहता सारिका यांना माहिकाला श्लोक पठणात रुची असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी माहिकला पाठांतर वर्गात दाखल केले. अशा रीतीने या माय-लेकीने स्पर्धेत सहभागी होण्याचे निश्चित केले. कालांतराने माहिकाचा श्र्लोक पाठांतराचा एक व्हिडिओ रेकॉर्ड बुकला पाठविण्यात आला आणि तो निवडला गेला. अवघ्या पाच मिनिटांत माहिकाने ३० श्लोकांचे पाठांतर केले आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीच्या नावाची नोंद झाली. तिच्या या कामगिरीसाठी बीएचआयएस शाळेच्या प्राचार्या श्रुतिका लवंद यांनीदेखील तिचे कौतुक केले.
आमच्याकडे नेमाने पूजा करण्याची पद्धत आहे. त्यात माहिका सोबतीला असायची. आमचे रोजचे श्लोक पठण तिच्या कानावर जात असत. तिने ते पटकन पाठ केले आणि इतक्या लहान वयात श्लोक शिकली. ती एक शिस्तशीर मुलगी आहे. आपल्या संस्कृती आणि परंपरेवर तिचे प्रेम आहे. इतक्या लहान वयात तिला हा छंद जडला असून आम्हाला त्याचा खूप आनंद आहे.
- सारिका पोतनीस, माहिकाच्या आई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.