इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ऑगस्ट २०२० अखेर मुदत संपलेल्या ६० तसेच उर्वरित ५५ ग्राम पंचायतीच्या आरक्षण पदाची सोडत येथील शहा सांस्कृतिक भवन मध्ये शांततेत पार पडली. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायततीवर महिला राज येणार असल्याचे सोडतीनंतर स्पष्ट झाले आहे.
तहसिलदार सोनाली मेटकरी, नायब तहसिलदार अनिल ठोंबरे, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे, गिरीश संधीकर, दीपक पवार यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. गावचे कारभारी ठरणाऱ्या या सोडतीकडे मात्र गाव कारभाऱ्यांनी पाठ फिरवली.
आरक्षणनिहाय ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे :
सर्वसाधारण- शेटफळगढे, पिंपळे, भिगवण, कुंभारगाव, अकोले, भादलवाडी, डाळज नंबर ३, पळसदेव, लोणी देवकर, सणसर, जाचक वस्ती, कुरवली, तावशी,हगारवाडी,गोतंडी, घोरपडवाडी, वालचंदनगर, निमसाखर, काटी, काचरवाडी ( नि ), वरकुटे खुर्द, शहा, जाधववाडी, अगोती नंबर १, पिंपरी खुर्द, तरंगवाडी, झगडेवाडी, वडापुरी, शेटफळ हवेली, सुरवड, टन्नू.
सर्वसाधारण महिला- डाळज १, डाळज २, बळपुडी, काझड, निंबोडी, पवारवाडी, बेलवाडी, थोरातवाडी, चिखली, न्हावी, शेळगाव, सराफवाडी, शिरसटवाडी, निरवांगी, दगडवाडी, कौठली, गंगावळण, कळाशी, कालठण नंबर १, अजोती, माळवाडी, बिजवडी, कांदलगाव, पंधारवाडी, बाभूळगाव, बावडा, भोडणी, निरनिमगाव, लुमेवाडी, गोंदी ओझरे, पिंपरी बुद्रुक, गिरवी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग- तक्रारवाडी, म्हसोबाचीवाडी, भावडी, आनंद नगर, लासुरणे, मानकरवाडी, व्याहळी, निमगाव केतकी, खोरोची, पडस्थल, सरडेवाडी, गोखळी, भांडगाव, चाकाटी,पीठेवाडी.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग-महिला- मदनवाडी, शिंदेवाडी, बोरी, कळस, रुई, भरणेवाडी, रेडा, रेडणी, बोराटवाडी, अगोती नंबर २, गलांडवाडी नंबर २, अवसरी, वकिलवस्ती, लाखेवाडी, कचरवाडी ( बावडा ), सराटी
अनुसूचित जाती-पोंदवडी, वरकुटे बुद्रुक, लाकडी, जांब, अनथुरने, कडबनवाडी, रणमोडवाडी, चांडगाव, कालठण नंबर २, भाटनिमगाव
अनुसूचित जाती, महिला- निरगुडे, जंक्शन, सपकळवाडी, उद्धट, पिटकेश्वर, कळंब, गलांडवाडी नंबर १, तरटगाव, हिंगणगाव, नरसिंहपूर
अनुसूचित जमाती- डिकसळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.