पुणे

पुण्यात 4 लाखांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या मोलकरणीला अटक

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : घरकाम करत असलेल्या ठिकाणचे चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या मोलकरणीसह दागिने घडविणाऱ्या एका कारागिराला पोलिसांनी अटक केली. सुनीता लष्करे (वय 30, रा. वडारवस्ती, येरवडा), खालीद सय्यद ऊर्फ बच्चू (वय 38, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संदिप कुलदिप कुमार ठुसू (वय 33, रा. कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठुसू यांच्याकडे काही महिन्यांपासून एक महिला घरकाम करण्यासाठी येत होती. मात्र काही दिवसांपासून ती कामवर येण्यास अचानक थांबली.

फिर्यादी व त्यांच्या पत्नीस संशय आल्याने त्यांनी घरातील दागिने व पैशांची तपासणी केली. त्यावेळी घरातील चार लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेस ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर तिच्याकडील चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी एक जोड सोन्याचे कानातील झुमके, एक सोन्याची अंगठी व चांदीची नाणी पोलिसांनी जप्त केली. तर उर्वरीत सोने तिने सोन्याचे दागिने घडविणाऱ्या खालीद सय्यद या कारागिराकडे दिल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने संबंधित महिलेकडून ते दागिने विकत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याकडून काही दागिने जप्त केले. त्यानुसार, पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर करपे यांचे पथक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टर मुलगा ठरला राजकीय सर्जन! वडिलांचा अनुभव, मुलाची रणनीती...; शिंदे पिता-पुत्रांच्या जोडीने ठाकरेंना दिला अनपेक्षित झटका

ZP School : ‘सकाळ’ला ऑनलाईन बातमी येताच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्वच शाळा सकाळच्या सत्रात भरणार; शिक्षण विभागाकडून निघाले आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

खुशखबर! विदर्भात अखेर मॉन्सून दाखल; दहा वर्षांत दुसऱ्यांदा उशिरा आगमन, येलो अलर्ट जारी

Manmad Crime : मनमाडमध्ये पहाटे दुहेरी हत्याकांड; महामार्गालगत झोपलेल्या दोघांना दगडाने ठेचले

SCROLL FOR NEXT