पुणे : सध्या "सोशल मीडिया'वर राजकारणी मंडळींची हुकूमत असतानाच बुधवारी "सोशल मीडिया'वर वेगळीच चर्चा होतेय. ती म्हणजे, एका मोलकरणीचे "व्हिजिटिंग कार्ड' व्हायरल झाल्याची. पुण्यातल्या बावधनमधल्या "घर काम मावशी' अर्थात, गिता काळे यांच्या नावाने हे कार्ड आहे. विशेष म्हणजे, आपल्याकडे अधिकृत आधारकार्ड असल्याचा उल्लेखही या मावशींनी कार्डवर केल्याने या पुणेकर मोलकरणीचीही चर्चा सर्वत्र रंगली.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
मोलकरणींच्या पारंपरिक कामांची म्हणजे, धुणी-भांडी, झाडू-पोछा, कपडे धुणे, भाकरी आदी कामांची यादी देतानाच, त्यासाठीच्या महिन्याकाठच्या पगाराचा उल्लेख करायलाही या मावशी अजिबात विसरल्या नाहीत. तेवढेच काय ? तर, मागणीप्रमाणे भाज्या निवडणे, कापणे आणि घराच्या सफाईचीही कामे केली जातील, असेही मावशींनी आपल्या "व्हिजिटिंग कार्ड'त आर्वजून सांगितले आहे.
भाजपविरहित सरकार स्थापन होणार; हालचालींना वेग
हे कार्ड व्हायरल होताच गिते मावशींचा फोन दिवसभर खणखणत होता. मात्र, आपल्या कार्डला मिळालेल्या प्रतिसाद आणि चर्चेत बहुदा त्या वैतागल्याच असाव्यात, कारण सायंकाळनंतर गिते मावशी एकही फोन घेत नव्हत्या. त्यानंतर रात्री गिते मावशी आपला "स्विच ऑफ'च केला. त्यावरून व्हायरल "सत्य की असत्य'चाही शोध सुरू झाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.