corona logo1.jpg 
पुणे

नारायणगाव कोरोनाच्या विळख्यात; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेले नारायणगाव, वारुळवाडी जून अखेर पर्यंत कोरोनामुक्त होते. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर मागील दीड महिन्यात नारायणगाव व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १६९ झाली आहे. या पैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्येत रोज वाढ होत आहे.

तालुक्यात सर्वाधिक रुग्ण नारायणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत तेरा तालुक्यात आढळले आहेत. यामुळे हा भाग तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. येथील बाजारपेठेत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने व्यापारी व बेजबाबदार नागरिक यांच्यापुढे हात टेकले आहेत.
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर याच भागात प्रामुख्याने मुंबईतून आलेले रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. तालुक्यातील लोकसंख्येची जास्त घनता असलेली व मोठी बाजारपेठ असलेली नारायणगाव व वारुळवाडी ही गावे कोरोनामुक्त राहावी यासाठी येथील सरपंच योगेश पाटे, सचिन वारुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ व  पोलीस प्रशासन यांनी लॉककडाऊन, रात्रगस्त, बाहेर गावाहून येणारे रुग्णसर्व्हे, सोशल डिस्टनसिंग, निर्जंतुकीकरण आदि उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली.

यामुळे व्यापारी व नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. मात्र नारायणगाव व वारुळवाडी परिसर मार्च ते जून दरम्यान कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले. जुलै पासून व्यापारी बाजारपेठ सुरू झाली.नियम व अटीचे पालन न केल्याने सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा उडाला. दोन जुलै रोजी नारायणगावात पहिला कोरोना रुग्ण आढळला. धालेवाडी येथील लग्नासाठी मुंबई येथून कोरोना बाधीत आला. तो वरातीत व लग्न कार्यक्रमात सहभागी झाल्याने धालेवाडी, धनगरवाडी, हिवरे बुद्रुक येथील वधू-वर व त्यांचे नातेवाईक असे जवळपास चाळीसजण पंधरा दिवसांत कोरोना बाधीत झाले. या मुळे मार्च ते जून दरम्यान स्थानिक ग्रामपंचायत,आरोग्य व पोलीस प्रशासन यांनी केलेल्या मेहनतीवर पाणी पडले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मागील दीड महिन्यात नारायणगाव, वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आर्वी, येडगाव, मांजरवाडी, धालेवाडी, धनगरवाडी, हिवरे बुद्रुक आदी तेरा गावात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या भागात रोज दहा ते पंधरा नवीन कोरोना रूग्णांची भर पडत आहे. मंगळवारी नारायणगावात तेरा रुग्ण आढळून आले. कोरोनाची साखळी वाढत चालली आहे. या मुळे या भागात पोलिस प्रशासनाने सोशल डिस्टनसिंगची कडक अंमलबजावणी करावी. नियमांचे पालन न करणारे व्यापारी व नागरिक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Union Budget 2026 Live : मानसिक आरोग्याबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Union Budget 2026 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त अन् काय महाग? वाचा संपूर्ण यादी...

Praful Patel NCP president : राष्ट्रवादी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती; पियुष गोयल यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ

Union Budget 2026 : अर्थसंकल्पात पुण्यासाठी मोठं गिफ्ट ! मुंबई- पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची घोषणा, दोन्ही शहरांतील अंतर होणार आणखी कमी

Stock Market Updates : बजेटसुरू होताच शेअर बाजार उसळला! सरकारचा 7 धोरणात्मक क्षेत्रांवर भर, कोणते सेक्टर तेजीत?

SCROLL FOR NEXT