पुणे

अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

बीआरटी बस स्टॉपला कारची धडक

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : खराडीत बीआरटी बस स्टॉपला कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वाघोलीतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच वाघोली परिसरामध्ये शोककळा पसरली.

सात दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी पुण्याहून वाघोलीच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारची खराडी बायपास येथील बीआरटी बस स्टॉपला जोरदार धडक बसून कार मधील संकेत रामचंद्र भुजबळ (वय २२), ओम राहुल पवळे (वय १७) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर प्रफुल्ल अंकमंची (वय २१) व वाघोली-संभाजीनगर येथील गौरव संजय साठे (वय २२) हे दोघेजण गंभीर जखमी झाले होते. गौरव साठे याच्यावर खराडी येथील मनिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.त्याच्या मृत्यूची बातमी वाघोली परिसरात समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सोलापूरसाठी मोठी भेट! शर्तभंग झालेल्या ‘या’ जागा होणार वर्ग-१; एका शासन निर्णयात १०० वर्षांपूर्वीचा प्रश्न मिटला, वाचा...

व्यापारी जहाजावर रशियन क्षेपणास्त्राचा भीषण हल्ला; चार भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताकडून संताप

Pune News : शिफारशीच्या भरतीमुळे सुरक्षा यंत्रणा 'कमकुवत'; महापालिका आयुक्तांच्या उत्तराने नगरसेवकांची कोंडी

AC Local Close : हार्बर मार्गावरील सात एसी लोकल फेऱ्या रद्द! तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना

Pali News : सुधागड तालुक्यातील कोशिंबळे धबधब्याच्या डोहात स्थानिक नागरिक बुडाला

SCROLL FOR NEXT