Major traffic jam on Khed-Shivapur toll due to the FASTag system 
पुणे

Video : नाताळ निमित्त विकएंडला बाहेर पडलेले पुणेकर अडकले कोंडीत

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर(पुणे) : नाताळाच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच पुणेकर मोठ्या संख्यने बाहेर पडले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. तसेच टोल नाक्यावरील फास्टॅग यंत्रणेचा बोजवारा उडाला असून प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. 

पुण्यात महावितरणचा कारभार; ट्रान्स्फॉर्मरसाठी बिल्डरांकडून हात ओले
नाताळ निमित्त विकएंडला बाहेर पडले पुणेकर
नाताळ सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच विकएंडची संधी साधून शनिवारी सकाळपासूनच नागरिक नाताळच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्याचा परिणाम खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. वाहनांची रांग पाठीमागे बंगला चौकापर्यंत गेली आहे. 

पुण्यात समान पाणीपुरवठ्यासाठी फेरनिविदा? 
फास्टॅग यंत्रणेचा उडाला बोजवारा: पुणेकर अडकले कोंडीत
नाताळच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी निघालेल्या नागरिकांचा टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीत मोठा वेळ वाया जात असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. त्यात या टोल नाक्यावर आठवड्यापूर्वी फास्टॅग यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. मात्र फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची जास्त संख्या, फास्टॅग मार्गिकेतूनच जाणारी इतर वाहने यामुळे फास्टॅग यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
पुण्यात मेट्रो जूनमध्ये धावणार  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT