पुणे

घटनेत टिकणारे आरक्षण द्या, अन्यथा...; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी शक्यता तपासून कसा पर्याय काढता येईल, यावर विचार करावा. तसेच, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी घटनात्मकदृष्ट्या टिकणारे आरक्षण देण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावीत; अन्यथा राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आला.

पुण्यात शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडण्यात आली. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक राजेंद्र कोंढरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने एसइबीसी प्रवर्ग कायदा आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशीशी असहमती दर्शवत मराठा आरक्षण फेटाळले आहे. या अहवालाच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजातील अंगमेहनती कामगार, माथाडी, मजुरी, मोलकरीण, रिक्षावाले, डबेवाले, अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांच्याबाबतचे सर्वेक्षण न्यायालयापुढे जोरदारपणे मांडण्यात आले नाही.

राज्य सरकारने ५० टक्के पुढील आरक्षण मर्यादा लक्षात घेऊन देशातील इतर राज्यांनाही प्रतिवादी करून घेतले. एखाद्या समाजाचे शिक्षण व नोकरीमधील प्रतिनिधित्व मोजण्याचा फॉर्मुला या निकालात बदलला आहे. त्यामुळे देशात यापुढे अपुरे प्रतिनिधित्व मोजण्यासाठी या निर्णयाने मोठा परिणाम होणार आहे. यामुळे केवळ मराठा आरक्षण संपुष्टात आले नसून, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. या निकालामुळे अन्य राज्यांमधील इतर समाजांच्या आरक्षणाच्या आकांक्षावर पाणी पडले आहे. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे.

राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपात मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. राजकारणातील श्रीमंत मराठ्याकडे पाहून मराठा समाजाची प्रतिमा सत्ताधारी, खासदार, आमदार, साखर सम्राट, शिक्षण सम्राट, बलशाली, श्रीमंत, बागायतदार अशी केली जाते. परंतु या समाजात अंगमेहनती कामगार, माथाडी, मजुरी, मोलकरीण, रिक्षावाले डबेवाले यापासून अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्या मुलांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

  • - ९ सप्टेंबर २०२० पूर्वी सर्व निवड झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्ती आदेश द्यावेत.

  • - सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ द्यावा

  • - उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहू शैक्षणिक प्रतिपूर्ती योजनेत सुधारणा करून दीड लाखांच्या आतील उत्पन्नधारकांना सवलत द्यावी.

  • - मराठा आरक्षणाचा विषय सोडविण्यासाठी घटनातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मदत करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT