पुणे

कृषी विधेयकाच्या विरोधात 'एक गाव, एक ठराव' करा : गणेश देवी

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने "एक गाव, एक ठराव' करावा. तसेच, राज्यातील एक लाख ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारचे विधेयक शेतकरी आणि कामगारविरोधी आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. ही यात्रा मंगळवारी पुण्यात आली. त्यावेळी देवी यांनी पुणे बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, अडते यांच्याबरोबर संवाद साधला. राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, कामगार युनियनचे संतोष नांगरे आदी उपस्थित होते.

देवी म्हणाले, 'केंद्र सरकारने कृषी, पणन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा अपप्रचार केला आहे. प्रत्यक्षात हे विधेयक शेतकरी, कामगारविरोधी आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी राज्यात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने या विधेयकाच्या विरोधात ठराव करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. या ठरावांमुळे केंद्र सरकारला विधेयकात बदल करावा लागणार आहे.''

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT