Tukaram Supe sakal
पुणे

पुणे : मला बळीचा बकरा बनविण्याचा कट; अ‍ॅड. मिलिंद पवार

तुकाराम सुपेच्या वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद टीईटी पेपरफुटी प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना बळीचा बकरा बनविण्यात आला आहे. पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन तपास केल्यास सत्य समोर येईल, असा युक्तिवाद अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी केला.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांच्या न्यायालयात सुपे याने जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने पुणे सायबर पोलिसांना नोटीस पाठवीत सुपे यांच्या जामीनावर म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.(TET exam fraud case )

त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. गैरव्यवहाराशी सुपे यांचा काही एक संबंध नाही. त्यांनी पोलिसांना तपासास पूर्ण सहकार्य केले असल्याचे अ‍ॅड. पवार यांनी युक्तिवादादरम्यान नमूद केले. दरम्यान २०१८ मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहिरातीनुसार १५ जुलै २०१८ रोजी ही परिक्षा घेण्यात आली होती. तर तिचा निकाल १२ ऑक्टोंबर २०१८ मध्ये लागला होता. ही सर्व परिक्षा घेण्याची जबाबदारी जी. ए. सॉफ्टवेअरकडे होती. अश्विनकुमार महाराष्ट्रासाठी व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. त्याच्यावर परीक्षेचे आयोजन व निकाल संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी होती. त्याचाच फायदा घेऊन जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विन कुमार याने नेमणूक असलेल्या तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, तुकाराम सुपे, प्रीतिश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.(TET exam scam )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Woman Army Officer : कोल्हापूरची ताराराणी दुश्मनाला करणार नेस्तनाबूत! २३ वर्षीय सई जाधवची IMA मध्ये ऐतिहासिक निवड, १६ पुरुषांमधून निवड

गोलाला छोटा भाऊ मिळाला! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, घरी पुन्हा किलबिलाट

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Putrada Ekadashi 2025: यंदा 30 की 31 डिसेंबर कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणून घ्या अचूक तारीख, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व

Asia Cup U19: भारताने दिलेली जखम पाकिस्तानच्या जिव्हारी! उपांत्य फेरीत न खेळताच जाणार घरी; बांगलादेश फायनलला पोहोचणार

SCROLL FOR NEXT