पुणे

कांद्याच्या पट्टीच्या चोरीचा बनाव आला अंगलट; हातात पडल्या बेड्या

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : कांद्याच्या पट्टीची रक्कम चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या ट्रक चालकाला वडगाव निंबाळकर पोलिसांनी बेड्या ठोकुन जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.

शिवाजी बाळासाहेब ठोंबरे (रा. गिरीम ता. दौंड) असे या ट्रकचालकाचे नाव असून, याबाबत कांदा एजंट अंकुश एकनाथ खताळ (रा. गिरीम ता. दौंड) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

कोल्हापूर येथील मार्केटमध्ये शिवाजी तलवार व गुलाब घुले शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी नेला होता लिलाव झाल्यानंतर दोन्ही शेतकरी घरी आले पाठीमागून कांद्याचे पट्टीची रक्कम ३ लाख ५९ हजार ४८६ रुपये घेऊन येण्यासाठी आरोपी शिवाजी ठोंबरे याला सांगीतले.

शनिवार (ता. 17) रात्री ट्रक घेऊन येताना नीरा-मोरगाव मार्गावर पाठीमागून आलेल्या काळ्‍या स्कार्पिओ मधील चोरट्यांनी ट्रकवर दगडफेक करत रक्कम चोरून नेली. असे शेतकरी आणि पोलिसांना सांगितले संबंधित तक्रारीची दखल घेऊन पोलीस घटनास्थळाची पहाणी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाका-बंदीचे आदेश झाले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी चालक सांगत असलेली माहिती आणि घडलेली घटना यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी चालकाची उलटतपासणी केली. यावेळी ट्रक चालकच चोर असल्याचे उघडकीस आले. कांद्याचे पट्टीची रक्कम गाडीत साउंड बॉक्समध्ये लपवून ठेवली होती. यामध्ये मोबाईल आढळून आला. चालकावर जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून बेड्या ठोकण्यात आल्या असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT