श्री नागेश्वर महाराज मंदिर सभागृह, मोशी - भंडारा उत्सवातील मानाचा समजला जाणारा विडा, ओटी आणि लिंबू यांचा लिलाव घेणारे ग्रामस्थ. 
पुणे

अरे बापरे! मानाच्या विड्यासाठी मोजले तब्बल ३० लाख! कोठे ते पहा?

सकाळवृत्तसेवा

मोशी - विडा ३० लाख, ओटी ११ लाख आणि हार, ताट, लिंबू हे पाच लाखांना... हे दर कोणत्याही वस्तूंचे नसून, ते आहेत मोशीतील श्री नागेश्‍वर महाराजांच्या परंपरागत मानाचे. यंदा हा मानाच्या विड्याचा मान माजी नगरसेवक बबनराव रामचंद्र बोराटे व हवेली बॅंकेचे माजी अध्यक्ष संजय बबनराव बोराटे यांना मिळाला. दिलीप किसन सस्ते यांना मानाची ओटी; मानाचे हार, ताट, लिंबूंचा मान गणेश तुकाराम कुदळे आणि मानाचे लिंबू संभाजी बबन बोऱ्हाडे यांना मिळाला, असे श्री नागेश्‍वर महाराज देवस्थान ट्रस्टकडून सांगितले.

श्री नागेश्‍वर महाराज भंडारा उत्सवामधील प्रमुख आकर्षण आणि उत्कंठा असलेला विषय म्हणजे नागेश्‍वर महाराजांना अर्पण केलेल्या वस्तूंच्या लिलावाचा. गेली अनेक वर्षे ही परंपरा ग्रामस्थ जपत आहेत. श्री नागेश्‍वर महाराज भंडारा उत्सव व आराध्यदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा साजरी करतात. शनिवारी या भंडारा उत्सवाची सुरुवात श्री नागेश्‍वर महाराज पादुकांना महाभिषेक घालून झाली. मानाचा कलश व पादुकांची मंदिर ते आमराईतील महाराजांच्या तपोभूमीपर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

तपोभूमीमध्ये होम करण्यात आला. महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी व विविध वस्तू अर्पण करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी बुंदी व शाकभाजी या महाप्रसादाचे वाटप झाले. रविवारी (ता. २३)  महाराजांना अर्पण केलेले चांदीचे नंदी, नागदेवता, पितळी घंटा, मूर्ती, नारळ तोरणे, मानाचे लिंबू, प्रसाद म्हणून बुंदी, पेढे, गूळ, साखर तसेच विविध वस्तू यांचा सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत मंदिर सभागृहात लिलाव सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐकावं ते नवलच! चक्क सरबतावर लावला 'गॅस क्रायसिस चार्ज', लिंबू गरम करून वापरला का? युजर्सचा सवाल

'पहिली बिअर मला माझ्या वडिलांनी पाजली' अभिनेत्री भारती आचरेकरचं वक्तव्य, म्हणाल्या...'माझे वडील युपीचे होते आणि त्यांनी...'

डान्स टीचरची दहावीच्या विद्यार्थ्याकडे भलतीच मागणी, ब्लॅकमेलला मुलगा कंटाळला; झुडपात नेऊन संपवलं, पोलिसांपासून ५६ दिवस कसा वाचला?

Crime: पत्नीवर नको तो संशय, व्यावसायिक पती संतापला, रागाच्या भरात धक्कादायक कृत्य; मुंबईत खळबळ

Latest Marathi Update : पवना नदीत पोहायला गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT