Cheating
Cheating sakal
पुणे

बनावट कागदपत्रांद्वारे व्यवस्थापकानेच केली फायनान्स कंपनीची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना कर्ज मंजूर करून फायनान्स कंपनीची तब्बल 2 कोटी 16 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी इम्तियाज रफाई (वय ३६, रा. दापोडी ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ कालावधीत मांगडेवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इम्तियाज रफाई यांची मांगडेवाडीत विसेज होल्डिंग्ज अ‍ॅण्ड फायनान्स लिमीटेड कंपनी या नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीत काही वर्षापासून एक व्यवस्थापकपदावर कामाला होता.आरोपीने कंपनीकडून कर्ज घेतलेल्या एका कर्जदारासोबत संगनमत करून त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना कर्ज मंजूर करून दिले. त्यानुसार नोव्हेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ कालावधीत व्यवस्थापकाने ने फायनान्स कंपनीची तब्बल २ कोटी १६ लाखांची फसवणूक केली. तसेच त्याने संबंधित फायनान्स कंपनीच्या बँक खात्याचे बनावट स्टेंटमेंट काढून इम्तियाज यांची दिशाभूल केली. दरम्यान , कंपनीच्या लेखापरीक्षणाच्यावेळी संबंधित फायनान्स कंपनीची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. त्यानुसार इम्तियाज यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT