khadaki.jpg
khadaki.jpg 
पुणे

सर्वपित्री अमावस्येला केलेले आंदोलन पावले...  

नवनाथ भेके

निरगुडसर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर- रांजणी या रस्त्यावरील खड्डे सध्या मुरूम व खडीने भरले जाणार असून, पावसाने उघडीप देताच खड्डे डांबर टाकून दुरुस्ती करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. डी. शेडेकर यांनी दिली. त्यामुळे ग्राहकपंचायतीच्या आंदोलनाना यश मिळाले आहे. 

मंचर- रांजणी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे नितीन मिंडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे यांच्यासह सुमारे कार्यकर्त्यांनी सर्वपित्री अमावस्येच्या मुहूर्तावर खड्ड्यांभोवती रांगोळी काढून पुरणपोळीचा नेवैद्य दाखवत निषेध केला होता. याबाबत ‘सकाळ'मध्ये १८ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची संबंधित विभागाने तातडीने दखल घेत रस्ता दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले. 

याबाबत शेडेकर यांनी सांगितले की, मंचरपासून पुढे एस कॉर्नर, तुकानाना चौक, चांडोली खुर्द, चांडोली बुद्रूक, खडकी फाटा, थोरांदळे, कारफाटा, रांजणी आदी ठिकाणावरील खड्डे सध्या मुरूम व खडी टाकून बुजविण्यात येणार आहे. तसेच, पाऊस संपताच डांबर टाकून खड्डे बुजविले जातील व ज्याठिकाणी एका जागेवर खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याठिकाणी डांबरीकरणाचे मोठे पॅच मारुन रस्ता खड्डेमुक्त करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT