पुणे

मुळशी तालुक्यात अनेक जण मतदानापासून वंचित

बंडू दातीर

पौड :  तथापि पदवीधरांपेक्षा शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत मतदानाचा टक्का वाढविला. प्रथमच प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणूकीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींही केंद्रांवर ठाण मांडून होते.

तालुक्यात पौड, लवळे, घोटवडे आणि मुठा याठिकाणी मतदान केंद्रे होती. यावेळी निवडणूकीच्या कामातून ऐनवेळी शिक्षकांना वगळण्यात आल्याने मतदान करून शिक्षकांनी नैमित्तिक सुट्टीचा लाभ उठविला. सकाळच्या पहील्या चार तासातच शिक्षकांचे सरासरी पन्नास टक्के मतदान झाले होते. दुचाकी, चारचाकी घेवून शिक्षकांनी एकत्रित येत मतदान केले. एका मतदाराची मतदानाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दोन मिनीट लागत होते. त्यामुळे पौड, लवळे या केंद्रांवर मतदारांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, पौड पोलिस आणि आरोग्य पथकाने चोख पूर्वतयारी केली होती. प्रत्येक मतदारांची थर्मल तपासणी केली जात होती. सॅनिटायझर घेत तोंडावर मास्क घालत सोशल डिस्टन्स पाळून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तथापि शिक्षक आणि पदवीधर मतदार यादीतील मोठा घोळ यावेळी समोर आला. पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगरात राहणाऱ्या बऱ्याचशा मतदारांची नावे तालुक्यातील केंद्रांमध्ये समाविष्ट झाली होती. तसेच पौड परिसरात राहणाऱ्या मतदाराचे नाव लवळे किंवा घोटवडे केंद्रात लागले होते. तर अगदी हाकेच्या अंतरावर केंद्र असलेल्या मुठा, कोंढूर, आंदगावच्या शिक्षकांना पौडला येण्याची वेळ आली. तथापि घोटवडे केंद्रात केवळ दोन शिक्षकांसाठी एक केंद्र होते. तर लवळ्यात मात्र हाच आकडा 474 असल्याने येथे मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आला होता. दोन मतदान करणाऱ्या शिक्षकांना पदवीधरसाठी एका केंद्रावर तर शिक्षक मतदानासाठी दुसऱ्या केंद्रावर जावे लागले.

तालुक्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनीधींनी दिवसभर मतदान केंद्रांना भेट देत मतदानाचा आढावा घेतला. पौड केंद्रात भाजपाने बुथही लावला होता.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडिया आघाडीची महारॅली, रामलीला मैदान परिसरात ४ हजार पोलीस, २०० सीसीटीव्ही आणि कंट्रोल रूम

Smile Day 2026: आज ‘स्माइल डे’! एक हसरा फोटो शेअर करा, ‘सकाळ’च्या हास्योत्सवात सहभागी व्हा

Importance of Theatre in Society : मनोरंजनापलीकडे नाटकाची भूमिका; प्रेक्षक, समाज आणि संस्कृतीला समृद्ध करणारी रंगभूमी

मुंबईत CNG महागला, महानगर गॅसने पुन्हा दरात केली वाढ; जाणून घ्या किती आहे दर?

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण; सोनं ५ हजार तर चांदी ३० हजारांनी घसरली

SCROLL FOR NEXT