पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या राजगडावर सापडला चोर दरवाजा

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : किल्ले राजगड (ता. वेल्हे) येथे पाली या राजमार्गावरुन गेल्या नंतर पाली दरवाजा बुरुजात अनेक वर्षापासून लपलेला चोर दरवाजा दगड मातीने बुजला होता. सह्याद्री प्रतिष्ठानचा ग्रुप किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता, यावेळी निर्दशनास आल्यानंतर हा दरवाजा पुर्ववत खुला करण्यात आल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.

सर्व गडांचा राजा व राजांचा गड राजगड. रयतेच स्वराज्य स्थापन करुन स्वराज्याचा सर्वाधिक काळ राजधानी राहिलेला व छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक सहवास लाभलेल्या राजगड परिसरात आजही अनेक शिवकालीन वस्तू व वास्तुंचे दर्शन होत असल्याने राजगडावर पर्यटकांची सख्या वाढत चालली आहे.  हजारो पर्यटक, शिवप्रेमी संघटना किल्ल्यावर येत असतात त्यापैकी एक सह्याद्री प्रतिष्ठानचा ग्रुप नुकताच राजगडावर आला होता. पाली दरवाजा बुरुज परिसरात फिरत असताना बुरुजावर दगड दिसले हि दगडे व माती बाजुला केल्यानंतर एक चोर दरवाजा दिसला. राजगडाच्या पाली दरवाज्याच्या सुरक्षततेसाठी उभारण्यात आलेल्या बुरुजात असलेला चोर दरवाजा काळाच्या ओघात बुजला होता.

बुरुजावरील सात ते आठ मोठ्या दगडी व माती बाजूला केल्यानंतर ३ फुटी उंचीचा व २ फुट रुंदीचा चोर 
दरवाजा पुर्ववत केला. यावेळी  सह्याद्री प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा व सोलापुर जिल्ह्यातील मावळे उपस्थित होते.

किल्ले राजगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह व पर्यटक निवासस्थान दुरुस्ती शिवकालीन वस्तूंचे जतन करण्यासाठी संग्रहालय, यांची कामे सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे निधी न मिळाल्याने हि कामे थांबली आहेत. -विलास वाहणे, पुरातत्व खाते सहसंचालक

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT