Maratha_Kranti_Morcha 
पुणे

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महावितरणमध्ये विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरतीसाठी होत असलेली पडताळणी प्रक्रिया मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाच्या माध्यमातून बुधवारी (ता.२) उधळून लावली. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रास्ता पेठेतील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेले उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील, विकास पासलकर, राजेंद्र कुंजीर, बाळासाहेब आमराळे, तुषार काकडे, युवराज दिसले, अमर पवार, किशोर मोरे, सचिन आडेकर, श्रृतिका पाडळे, सचिन पवार, अश्‍विनी खाडे, महेश यादव, अनिल मारणे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 

राज्य सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरी प्रवेश प्रक्रियेत डावलून इतरांसाठी प्रक्रिया सुरु केल्याप्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे. महावितरणने भरतीमध्ये मराठा एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना समाविष्ट केलेले नाही. सरकारने आश्वासन न पाळल्यामुळे भरती करू नये, सरकारच्या पुढील आदेशापर्यंत एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज असलेल्या उमदेवारांची त्वरीत करावी, अशी मागणी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार आणि अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांना निवेदन देण्यात आले. 

या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चित्रे पाटील म्हणाले, महावितरण उपकेंद्र सहायक पदासाठी सरकारने 28 जून रोजी यादी प्रसिद्ध केली. त्याच वेळी कागदपत्रांची पडताळणी आणि नियुक्‍त्या होणे अपेक्षित होते. मात्र, एसईबीसी विद्यार्थ्यांना वगळून 2 डिसेंबर रोजी शटर बंद करुन पडताळणी चालू होती. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही पडताळणी बंद पाडण्यात आली आहे.

पासलकर म्हणाले, सरकारने महावितरणमध्ये भरती करताना सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना डावलून पडताळणी प्रक्रिया सुरु ठेवली आहे. ही प्रक्रिया शटर बंद करुन केली जात असून, या घटनेचा आणि सरकारचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत आहे. सरकारने त्वरीत सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय देऊन ही भरती प्रक्रिया एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह पूर्ण करावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : नाशिक महानगरपालिकेत पुन्हा भाजपाला संधी? आतापर्यंत कुणाला किती जागा? वाचा...

BMC निवडणुकीत विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट ते मनसे; कुणाचे किती उमेदवार जिंकले?

Latur Municipal Corporation Election Result 2026 : लातूरमध्ये विलासरावांच्या पुण्याईचा विजय, भाजपच्या सेल्फ गोलचा काँग्रेसने कसा उठवला फायदा ?

Baramati Municipal: बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची निवड; शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार!

Ichalkaranji Result 2026 Won Candidate List : इचलकरंजीत भाजपचा बोलबाला की धक्का? चुरशीच्या लढतीनंतर महापालिकेत सत्ता कुणाची? वाचा विजयी उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT