Maratha_Kranti_Morcha 
पुणे

MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठा क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे लाखो विद्यार्थी संभ्रमात आहेत. अशा स्थिती राज्यात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा होणार आहेत. यात मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, अन्यथा परीक्षा उधळून लावल्या जातील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला.

पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राहुल पोकळे यांनी ही माहिती दिली. यावेळी शहर समन्वयक सतीश काळे, जिल्हा समन्वयक परमेश्‍वर जाधव, प्रशांत चव्हाण, अनुप देशमुख यावेळी उपस्थित होते.

'एमपीएससी'तर्फे 11 ऑक्‍टोबर रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा, 1 नोव्हेंबर तर 22 नोव्हेंबरला अराजपत्रित गट ब च्या परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरताना आरक्षण अस्तित्वात असल्याने मराठा तरुणांनी 'एसईबीसी' या प्रवर्गातून अर्ज भरला. कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली, त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांचे नुकसान होणार असल्याने आरक्षणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य सरकार आणि आयोगाकडे केली आहे. पण त्यावर काहीच उत्तर मिळत नाही. ही परीक्षा पुढे ढकलावी अन्यथा परीक्षा उधळून लावू, असे पोकळे यांनी सांगितले.

परीक्षार्थी प्रशांत चव्हाण म्हणाले, "माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. तसेच यापूर्वी जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना अद्याप नेमणुकीची ऑर्डर दिली नाही. त्यांचे काय होणार याबद्दल काहीच बोलत नाहीत.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : जयपूर परीक्षा केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत TCS iON चे निवेदन

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT