Sarathi 
पुणे

'सारथी'तील विस्कळीत कारभाराबाबत मराठा संघटना काय म्हणाल्या पाहा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या अनेक महिन्यापासून 'छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे'चा (सारथी) कारभार विस्कळीत झाला आहे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि  मानधन मिळत नाही. या संस्थेचा कारभार सुधारून त्वरीत मदत करा, अशी मागणी मराठा क्रांती (मुक्त) मोर्चा, अखिल भारतीय मराठा महासंघाने 'सारथी'चे प्रमुख अशोक काकडे यांच्याकडे केली आहे. 

मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम संधी मिळावी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा, संशोधन करता यावे यासाठी 'सारथी'तर्फे योजना राबविण्यात येतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून 'सारथी'च्या कारभाराला विद्यार्थी वैतागले आहेत. 

जुलै २०१९ मध्ये 'सीएमएसआरएफ' निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. निवड झालेल्या १४६ संशोधकांना जून महिना सुरू झाला तरी एकाही महिन्याचे मानधन मिळालेले नाही. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनाही दोन महिन्यापासून मानधन मिळाले नाही. याबद्दल अनेकदा तक्रारी करून देखील 'सारथी'कडे राज्य सरकार व अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत.

विद्यार्थी कष्ट करण्यास तयार आहेत, पण त्यांना मदत केली जात नाही, हे वेदनादायक आहे. त्वरीत सारथीचा विस्कळीत कारभार सुधारावा अशी मागणी राजेंद्र कोंढरे, नितीन साळुंखे, नामदेव मानकर, राकेश गायकवाड, गणेश  मापारी  बाळासाहेब अमराळे, युवराज देसले, किशोर मोरे, मीना जाधव, श्रृतीका पाडळे यांनी केली आहे.

संस्था बंद पाडण्याचा कट उधळून लावू

सरकार एका बाजूला मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ४३१ कोटी रुपये देत आहे. पण हा न्याय 'सारथी' संस्थेला लावला जात नाही. हे विद्यार्थी शासनास होतकरू वाटत नाहीत का? विद्यार्थांना मदत झालीच पाहिजे, ही संस्था बंद पडण्याचा कट उधळून लावू, असा इशारा मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT