maratha samvad morcha 
पुणे

#MarathaKrantiMorcha बारामतीत मराठा संवाद यात्रेस आजपासून प्रारंभ

मिलिंद संगई

बारामती : गेल्या काही दिवसात राज्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा नांदावा या साठी आजपासून बारामतीतून मराठा संवाद यात्रेस प्रारंभ झाला. प्रशांत नाना सातव यांनी मराठा संवाद यात्रेचे आयोजन केले असून बारामतीतून निघून मुंबईला नऊ ऑगस्टला आझाद मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे.

सासवड, पिंपरी चिंचवड व नवी मुंबई येथे या यात्रेचा मुक्काम होणार आहे. या यात्रेदरम्यान माहिती पत्रकाचे वाटप होणार असून आरक्षण मोहिमेत शहिद झालेल्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. 

आज बारामतीत शिवाजी उद्यानामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या संवाद यात्रेचा प्रारंभ झाला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार हनुमंत पाटील, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या

विश्वस्त सुनंदा पवार, माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे, माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विशेष तयार करण्यात आलेली प्रतिज्ञा सर्वांनी सामूहिकपणे घेतली. या  संवाद यात्रेचा उपक्रम समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मान्यवरांनी या प्रसंगी नमूद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आचारसंहितेच्या काळातही लाडक्या बहीणींना हप्ता मिळणार, पण... १८ नोव्हेंबरची मुदत संपली तर लाभ थांबणार!

Jana Gana Mana Controversy : 'जन गण मन' हे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी रचलेले गीत; भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

Shocking News : मालकिणीचे कामगारावर जडले प्रेम, लग्नानंतर पती पैसे घेऊन फरार; महिलेने पोलिस ठाण्यात उचलले टोकाचे पाऊल

Bribery Action : 'साताऱ्यात लाचप्रकरणी लिपिक जाळ्यात'; शेळी पालनासाठी कर्ज मंजुरीसाठी मागितले पैसे, जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT