darwadh
darwadh 
पुणे

पाणीपट्टी दरवाढ म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मलाई खाण्याचा प्रयत्न : राष्ट्रवादी

रवींद्र जगधने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगारांची नगरी आहे. गेल्या दहा वर्षात या नगरीला विकासनगरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादीने शहरातील करदात्यांना "किमान कर, कमाल सुविधा' अशी करप्रणाली ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु, आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पाणीपट्टीत दुपटीने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकार म्हणजे करदात्यांच्या खिशात हात घालून स्वतः:च्या घशात मलाई टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा, आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला.

महापालिकेतर्फे आकारला जाणारा शास्तीकर रद्द करावा, शास्तीबाबत राज्य सरकारचा निर्णय येत नाही, तोपर्यंत शास्ती कर वसूल न करता सामान्य कर स्वीकारण्यात यावा, अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, महापालिकेने केलेली पाणीपट्टी दरवाढ आणि रिंग रोड रद्द करण्यात यावा, प्रस्तावित पाणीपट्टी लाभ कर मागील वर्षीप्रमाणे ठेवावा, तसेच पवना जलवाहिनी व चोवीस तास पाणीपुरवठा योजना त्वरित मार्गी लावावी, या अशा विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने केल्या.

याबाबत महापौर, आयुक्त, आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. तसेच करदात्यांकडून पठाणी वसूल करू नका, असे आवाहनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे. याबाबत राष्ट्रवादीने महापौर, आयुक्त आणि आठही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सुमारे बाराशे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये पिंपरी महापालिकेत अनेक वर्षानंतर सत्तांतर झाले. त्यानंतर आता शहरात नवनवीन आर्थिक संकल्पना रुजत आहेत. करदात्या नागरिकांकडून पठाणी वसुली करण्याचा प्रयत्न चालू आहे. शहरात चालू असणाऱ्या विकासकामांसाठी सत्ताधारी वाढीव दराने देत असलेली मंजुरी हे या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारासाठीच असणारे नियोजन आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात अनेक विकासकामात शेकडो कोटींची झालेली बचत कोणीही लपवू शकत नाही. आता मात्र, लुटारू व दरोडेखोरी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी थेट सर्वसामान्य करदात्या नागरिकांच्याच खिशात हात घालत आहेत. महापालिकेच्या पाणीदरात वाढ, पाणीपट्टी लाभ करात वाढ आणि शास्तीकर वसुलीवरून हे स्पष्ट होत आहे.

पिंपळे गुरव परिसरातून याची सुरवात केली. पिंपळे गुरव परिसरात प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी 'दुचाकी मोर्चा' काढण्यात आला. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ 'दुचाकीची हत्या' करण्यात आली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या अहमदनगर पालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नाना काटे, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, फजल शेख, राजू मिसाळ, राजेंद्र जगताप, अजित गव्हाणे, श्‍याम जगताप, तानाजी जवळकर, प्रदीप गायकवाड, वर्षा जगताप, गंगा धेंडे, राहुल भोसले, मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, विनया तापकीर, मयूर कलाटे, विशाल वाकडकर, विनोद नढे, संतोष कोकणे, अपर्णा डोके, उषा वाघेरे, प्रज्ञा खानोलकर, दत्ता (काका) साने, अनुराधा गोफणे, विक्रांत लांडे, गीता मंचरकर, समीर मासुळकर, भालेकर प्रवीण, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, भालेकर पंकज, सुमन पवळे, जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, सुलक्षणा शीलवंत, श्‍याम लांडे, हिरानंद आसवानी, निकिता कदम, उषा काळे, शीतल काटे, राजू बनसोडे, रोहित काटे, स्वाती ऊर्फ माई काटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT