Walchandnagar
Walchandnagar 
पुणे

वालचंदनगर-शिवयुग प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) :  वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे शिवयुग प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.

वालचंदनगर-रणगाव- कळंब परीसरातील युवकांनी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज शिवमूर्तीची पालखीमधून वाजत गाजत मिरणवणूक काढून  सभामंडपामध्ये आणण्यात आले. रणगावच्या सरपंच सुषमा राहुल रणमोडे यांचे हस्ते शिवमूर्तीची विधीवत पुजा करण्यात आली.

महिलांनी पारंपारिक पाळणा गाऊन शिवजन्मउत्सव साेहळा साजरा केला. युवतींनी, महिलांनी पारंपारिक पद्धतीने वेषभूषा करुन घातलेले भगवे फेटे लक्ष वेधून घेत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य शैला फडतरे, कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, तेजस्वीनी राणे, शिवसनेचे तालुकाध्यक्ष योगेश कणसे उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करुन मिरवणूकला सुरवात करण्यात आली. यावेळी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गायकवाड, ज्ञानदेव बोंद्रे, सत्यशिल पाटील, डॉ.नंदकुमार सोनवणे, सरपंच राहुल रणमोडे, विनाेद रणमोडे उपस्थित होते.

नागरिकांच्या स्वागतासाठी  सुमारे ५० फुट भव्य कमान उभारली होती. युवकांनी डीजे ला फाटा देऊन पारंपारिक ढोल, ताशा झांज पथकाची वाद्यच्या निनादामध्ये  मिरवणूक काढली. पारंपारिक वाद्याच्या आवाजाने वालचंदनगर परिसर दुमदुमला होता. भगवे झेंड्यामुळे वालचंदनगर  भगवेमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील निरवांगी,निमसाखर, शिरसटवाडी, रणगाव, कळंब, चिखली, कुरवली, लासुर्णे, जंक्शन, अंथुर्णे परीसरातील नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली हाेती. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवयुग प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू पवार,उपाध्यक्ष महेश बोंद्रे, खजिनदार प्रकाश साळुंके, गजानन बोंद्रे, कार्याध्यक्ष बापू रणमोडे यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT