marathi news pune pimpri YIN sakal politics
marathi news pune pimpri YIN sakal politics 
पुणे

राजकारणात तरुणांना चांगल्या संधी - सीमा सावळे 

रवींद्र जगधने

पिंपरी - राजकारण घाणेरडे आहे तर ते साफ करण्यासाठी तुम्हालाच ते साफ करण्यासाठी यावे लागेल. त्यामुळे राजकारणात तरुणांना चांगल्या संधी आहेत. असे प्रतिपादन महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष सीमा सावळे यांनी येथे केले. सकाळ 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) यांच्या वतीने येथील एएसएम महाविद्यालयात आयोजित 'सकाळ यिन संवाद'मध्ये त्या बोलत होत्या. त्यावेळी प्राचार्य डॉ. के. एम. जाधव, प्रा. सुभाष देवकुळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तरुणांचा राजकारणातील सहभागाबाबत चर्चा केली. 

सावळे म्हणाल्या, 'राजकारणात नवीन येणाऱ्यांना संघर्ष करावा लागतो. मात्र, संघर्षातून मिळालेल्या विजयाचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे तडफदार तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. कारण तरुण देशाचे भविष्य आहेत.' सावळे म्हणाल्या, 'शहरात घडणाऱ्या घडामोडींवर विद्यार्थ्यांचा सहभाग असला पाहिजे. राजकारणी जर चुकत असतील तर त्यांची चूक त्यांना ठामपणे दाखवली पाहिजे. ज्या देशाच्या तरुणांना प्रश्‍न पडत नाहीत, त्या देशाचे भविष्य अंधारमय असते. लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. जर राजकारणी योग्य नसेल तर नोटाचे बटन दाबून मतदान केले पाहिजे.' प्राचार्य जाधव म्हणाले, 'शहरातील अनेक सोसायट्यांना टँकरने पाणी पुरवठा होतो. शहर जर टॅंकर मुक्त झाले, तर खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी होईल.' महाविद्यालय यिन प्रमुख राजबीर होट्टी, देबोश्री सरकार, महेश पानमंद यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन मयूरी बांठिया यांनी केले. तर प्राचार्य के. एम. जाधव यांनी आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

Kolhapur Crime : राधानगरी तालुक्यात मुलाने वडिलांचा गळा आवळून केला खून; घरगुती वादातून उचललं टोकाचं पाऊल

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT