marathi
marathi 
पुणे

‘एबीसीडी’बरोबर आता ‘गमभन’ही!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इंग्रजी शाळांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटल्याचे आपल्याला दिसते. केवळ इंग्रजीच न शिकवता मराठीही उत्तम आली पाहिजे, असे आता पालकांना वाटत आहे. त्यामुळे आता ‘एबीसीडी’बरोबर ‘गमभन’चेही धडे मुलांना मिळावेत, याकडे पालकांचा कल वाढत आहे.

भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती ११ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरी करण्यात येते.

त्यानिमित्ताने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी यांनी सोमवारी ‘सकाळ’शी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी टिपलेली निरीक्षणे सांगितली.

जोशी म्हणाले, ‘‘विद्यार्थिसंख्या कमी होत असल्याने काही ठिकाणी मराठी शाळा बंद पडत असल्या, तरी आता पालकांचा कल बदलत आहे. केवळ इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देऊन पाल्याची प्रगती होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने इंग्रजीसोबतच मराठीही आवश्‍यक असल्याचे त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांचा मराठी माध्यमात प्रवेश घेण्याकडे कल आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद व शहरी भागात महापालिकेच्या शाळांमध्ये सकारात्मक प्रयोग केल्याने तेथे मराठी माध्यमातील संख्या वाढली. शहरे मोठी होत असताना त्या भागात इंग्रजी शाळा आहेत. पण, मराठी शाळा नसल्याने मुलांना कोठे प्रवेश घ्यावा, असा प्रश्‍न पालकांपुढे निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारनेही नवीन शाळांना परवानगी देताना आवश्‍यकतेनुसार केवळ मराठी शाळांना परवानगी द्यावी.’’

‘‘राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना त्यांनी वंचिताना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे, मुलांना पारंपरिक शिक्षणासह कौशल्य विकासाचेही धडे दिल्यास बेरोजगारीची समस्या कमी होईल. शिक्षण स्वस्त करण्यासाठी शिक्षणासाठी मोठा निधी दिला पाहिजे. राज्यातील देवस्थानांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे, तो शिक्षणासाठी उपलब्ध झाल्यास शिक्षण स्वस्त होऊ शकते. यासाठी खास कायदा करावा,’’ असे जोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT