पुणे

'नागरिकत्व'च्या निषेधार्थ पुण्यात उद्या मोर्चा; वाहतुकीत झाले मोठे बदल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत देशभर आंदोलने सुरू असताना शुक्रवारी शहरातही याचसंदर्भात मोर्चा काढण्यात येणार आहे. लष्कर परिसरातील बाबाजान दर्गा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते मोर्चा संपेर्यंत आवश्‍यकतेनुसार वाहतुक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतुक शाखेच्या पोलिसांनी केले आहे. 

संबंधित मोर्चा लष्कर परिसरातील बाबाजान दर्गा चौक येथून सुरू होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा भोपळे चौक, कोहीनूर हॉटेल चौकातून डावीकडे वळून महात्मा गांधी (एमजी रोड) रस्त्याने सरळ आंबेडकर पुतळ्याकडे जाणार आहे. तेथून डावीकडे वळून दोराबजी, नेहरू मेमोरीअल हॉल चौक, बॅनर्जी चौक, एसबीआय बॅंक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे. बहुतांश वाहतुक कमी वेळेकरीता वळविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी व इच्छित स्थळी पोचण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. 

* येथून वाहतुक वळविण्यात येईल :

गोळीबार मैदान चौक, खान्या मारुती चौक, धोबी घाट, मम्मादेवी चौक, रेसकोर्सजवळील पाण्याची टाकी, कॅम्पमधील गुरूद्वारा चौक,एसबीआय हाऊस चौक, अलंकार चित्रपटगृह, मालधक्का चौक,पावर हाऊस चौक, नरपतीगिरी चौक, ब्लु नाईल हॉटेल, किराड चौक, साधू वासवानी चौक, ईस्कॉन मंदिर चौक, शाहीर अमर शेख चौक, आरटीओ कार्यालय चौक, ब्लु डायमंड चौक, मंगलदास चौक, सादलबाबा चौक, पर्णकुटी चौक, संचेती चौक, लुल्लानगर चौक, आयबी चौक, व्होल्गा चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यान चौक, सरबतवाला चौक, कौन्सील हॉल चौक,जीपीओ चौक. 

वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे : 

एसएसपीएमएस मैदान, गोळीबार मैदान, आझम कॅम्पस, गुरूद्वारा रोड रस्त्याच्या दोन्ही बाजुस, ईस्कॉन मंदिरासमोरील दोन्ही बाजुस, ब्लु नाईल हॉटेलसमोरील रोड पुना क्‍लबजवळील रस्ता, आझम कॅम्पसमधील सेंट जॉन्स स्कूल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT