चिकन, मटण, मासळीला मागणी sakal
पुणे

मार्केट यार्ड : चिकन, मटण, मासळीला मागणी

अंड्यांच्या भावात शेकड्यामागे घसरण

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : गणेशोत्सवानंतर मटण, मासळी, चिकनच्या मागणीत मोठी वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची मोठी आवक झाली. बाजारात रविवारी (२६  सप्टेंबर) खोल समुद्रातील मासळी २० ते २५ टन, खाडीतील मासळी २०० ते ४०० किलो, नदीतील मासळी एक ते दीड टन तसेच आंध्रप्रदेशातून रहू, कतला, सीलन १४  ते १५ टन मासळीची आवक झाली.

गणेशोत्सवानंतर मासळीला मागणी वाढली असून नवरात्रोत्सवापर्यंत मासळीला चांगली मागणी राहील, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर मटण आणि चिकनला मागणी असल्याचे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे तसेच चिकन विक्रेते रुपेश परदेशी यांनी सांगितले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रतिकिलो चिकनच्या दरात २० रुपयांनी घट झाली आहे. गावरान तसेच इंग्लिश अंड्यांना चांगली मागणी आहे. गावरान अंड्यांच्या दरात शेकड्यामागे ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली. इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे २० रुपयांनी वाढ झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1200-1400  मोठे -1200-1400 मध्यम : 700-800, लहान 550-650, भिला : 480-550, हलवा : 450-550, सुरमई : 300-850, रावस : लहान 550-650, मोठा : 850 घोळ : 850, करली : 200-320, पाला : 1100-1500, वाम : पिवळी : 280-480, करंदी (सोललेली)-440-480 ओले बोंबील : 100-180, कोळंबी : लहान 160-280,  मोठी-360-480, जंबोप्रॉन्स : 1000  किंगप्रॉन्स : 850 लॉबस्टर : 1300, मोरी : 280-360, खेकडे : 280-320 चिंबोऱ्या : 400-550, मांदेली-120-130, राणीमासा-140-180

खाडीची मासळी : सौंदाळे-280, खापी - नगली : 300-400, तांबोशी : 400-480, पालू - 240, बांगडा : लहान-160-200, बांगडा मोठा- 240-320, शेवटे 240-280, खुबे : 120, लेपा-120-160, शेवटे-200-240, पेडवी-80-100, वेळुंजी-160, खुबे-120, तारली-160.

नदीतील मासळी

रहू-140-160, कतला-१४०-१६०, मरळ-360-400, शिवडा-200, खवली-200-220, आम्ळी-80-100, खेकडे-200-240, वाम-400-480

मटण- बोकडाचे 660, बोलाईचे- 660, खिमा-660, कलेजी-700

चिकन - 220, लेगपीस-280, जिवंत कोंबडी-150, बोनलेस-320

अंडी

गावरान ः शेकडा 910

डझन 120

प्रतिनगास 10

इंग्लिश ः शेकडा 472

डझन 66

प्रतिनगास 5.50

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT