Pune Fire News Esakal
पुणे

Pune Fire News: पुण्यातील वाघोली भागात गोडाऊनला भीषण आग; तीन जणांचा मृत्यू

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे शहरातील वाघोली भागामध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

शहरातील वाघोली भागात काल (शुक्रवारी) रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आगीची घटना घडली. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत ४ सिलेंडर फुटलेत. आगीची घटना समजताच त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

या घटनेत तीन तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेल नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर आता कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील धोका टळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गला गारपिटीचा तडाखा; कणकवली, वैभववाडीत आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान

Virat Kohli Tattoo: विराट कोहलीने हातावर गोंदवला 'कमळ'; काय आहे, नवीन टॅटूचा खास अर्थ?

Latest Marathi News Live Update : चैत्री एकादशीसाठी तयारी पूर्ण; दर्शन रांगेसाठी पत्राशेड, पंखे-कुलर आणि थंड पाण्याची व्यवस्था

निस्तेज त्वचा अन् डार्क सर्कल्स? महागड्या क्रीम्सऐवजी 'हे' 5 घरगुती उपाय ठरतील वरदान!

Maharashtra weather update : दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; विदर्भात तापमान वाढीचा इशारा

SCROLL FOR NEXT