Matang_Community 
पुणे

मातंग समाजाच्या शिष्टमंडळाचे राज्यपालांना साकडे; विधान परिषदेबाबत केली मागणी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर 'भारतरत्न' किताबाने सन्मानित करण्यात यावे. तसेच विधान परिषदेवर मातंग समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतली. 

पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल कोशियारी पुण्यात आले असताना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने ही भेट घेतली. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखालील गेलेल्या या शिष्टमंडळात आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भांडे, कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक अविनाश बागवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले, युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीपान झोंबाडे, लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे आदींचा समावेश होता. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावे, क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम गतीने व्हावे. मातंग आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तातडीने व्हावी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला तातडीने मोठ्या प्रमाणात भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या. तसेच राज्यात विधान परिषद अस्तित्वात आल्यापासून गेल्या सहा दशकात मातंग समाजाच्या एकाही व्यक्तीला राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून विधान परिषदेवर संधी मिळालेली नाही.

हा अनुशेष दूर करून अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाला न्याय द्यावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. यावर सकारात्मक राज्यपालांनी मातंग समाजाच्या मागण्या मंजूर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारला निर्देश देऊ, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT