पुणे : विद्यार्थी व शिक्षकांसाठी लॉकडाऊनच्या काळात नवीन प्रयोग उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आयसर पुणे येथील 'श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर'तर्फे सुरू करण्यात आला होता. हा उपक्रम अद्याप राबविण्यात येत असून शिक्षणासाठी कार्यशाळा आयोजित करणे व सहज उपलब्ध होणारे स्वस्त साहित्य वापरून गणित व विज्ञानाच्या मजेदार कृती आधारित शैक्षणिक साहित्याची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत या सेंटरने 150 विज्ञान व गणित कृतींना छायाचित्रांसहित (फोटोग्राफ्स) उपलोड केले आहेत. या कृती पाचवी ते दहावीच्या महाराष्ट्र आणि इतर बोर्डच्या गणित व विज्ञान अभ्यासक्रमांवर आधारित आहेत. यामध्ये भौतिक शास्त्रामध्ये विद्युत, चुंबकत्व, प्रकाश शास्त्र, हवेचे आकुंचन व प्रसारण, बल व गती, गुरुत्वीय बल, उष्णता, दाब, ध्वनी अशा अनेक संकल्पनांवर आधारित प्रतीकृती उपलब्ध आहेत. तसेच रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणितातील विविध संकल्पना सुद्धा यात समाविष्ट केल्या आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सद्यस्थिती पाहता या प्रतिकृतीचा विशेष उपयोग विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणामध्ये होऊ शकतो. या सर्व कृतींच्या कृतीपद्धती सध्या इंग्रजीमध्ये असल्या तरी त्या मराठीमध्ये भाषांतरित करण्याचे काम सुरु आहे. या उपक्रमाचा विद्यार्थी व शिक्षकांनी जरूर फायदा घ्यावा, असे आवाहन आयसरचे विज्ञान प्रसार प्रमुख, डॉ. हरिनाथ चक्रपाणी यांनी केले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच दर रविवारी ऍक्टिव्हिटी सेंटरच्या युट्युब चॅनेलवर या कृतींचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हे सर्व कार्यक्रम शिक्षक, विद्यार्थी व इच्छुक व्यक्तींसाठी खुले आहे. विज्ञान व गणिताच्या मजेदार कृती पाहण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या.
https://www.youtube.com/channel/UCL-bh2FfASAJ1jLARhqrh6A
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.