Ajit-Pawar
Ajit-Pawar 
पुणे

मावळ मतदारसंघात परिवर्तन घडवा - अजित पवार

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ  - ‘आगामी निवडणुकीत जातीयवादी शक्तींचा पाडाव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे काम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना साथ देऊन मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणावेत,’’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या परिवर्तन यात्रेची सभा रविवारी तळेगावात झाली, या वेळी पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, विजय कोलते, सुरेश घुले, जयदेव गायकवाड, रोहित पवार, सचिन घोटकुले आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांपैकी एकही आश्‍वासन या सरकारला पूर्ण करता आले नाही. नोटाबंदीमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले, त्यामुळे बेरोजगारी वाढली. महागाईने कळस गाठला आहे.’’

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘मोदी व फडणवीस यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण करता न आल्याने जनतेसमोर कसे जायचे हा प्रश्‍न सरकारला पडला आहे. मावळात पक्षाची मोठी ताकद असताना आमदार का येत नाही, याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा. आगामी निवडणुकीत दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल, यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करावेत.’’ 

भुजबळ म्हणाले, ‘‘२०१४ च्या निवडणुकीपूर्वी विकास व मोदी या मुद्द्यांवर बोलणारे सरकारमधील लोक अपयशी ठरल्याने आता धार्मिक मुद्दे काढू लागले आहेत. हुकूमशाही करणारे सरकार बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.’’

मुंडे म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. साडेचार वर्षांत एकही भ्रष्टाचार झाला नाही म्हणणाऱ्या राज्यातील मंत्र्यांनी सोळा हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. सरकार चालविण्याची अक्कल एकाही मंत्र्याकडे नाही.’’ बापूसाहेब भेगडे यांनी स्वागत केले. बबनराव भेगडे यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक किशोर भेगडे यांनी सूत्रसंचालन
केले. दीपक हुलावळे यांनी आभार मानले.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना महिना पाचशे रुपये देण्याचे जाहीर करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकारने केले आहे. डान्सबारवरील बंदी उठवून तरुण पिढीला बरबाद करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का, असे विचारण्याची व हे सरकार घालविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT