Corona_Positive 
पुणे

मावळात कोरोना घालतोय थैमान; एकाच दिवशी सापडले सव्वा दोनशे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात रविवारी (ता.२०) कोरोना रुग्ण संख्येने कळस गाठला. दिवसभरात तब्बल २२५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून लोणावळा येथील कोरोनाबाधित ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ३ हजार ८३४, तर मृतांची संख्या १२५ झाली आहे. २ हजार ६६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २२५ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक ९१, लोणावळा येथील ५३, कुरवंडे येथील १३, कुसगाव बुद्रुक येथील १२, इंदोरी येथील नऊ, तळेगाव दाभाडे ग्रामीणमधील आठ, चांदखेड आणि सुदवडी येथील प्रत्येकी चार, माळवाडी, कामशेत, कुणे नामा आणि वरसोली येथील प्रत्येकी तीन, कडधे आणि वराळे येथील प्रत्येकी दोन, तर टाकवे बुद्रुक, सोमाटणे, ब्राम्हणवाडी, साते, दहीवली, नवलाख उंब्रे, कांब्रे नामा, चिखलसे, मळवली, वाकसई, कार्ला, ताजे, इंगळूण, पवळेवाडी आणि वडवली येथील प्रत्येकी एकजणाचा समावेश आहे. 

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ८३४ झाली असून त्यात शहरी भागातील २ हजार २१८ तर ग्रामीण भागातील १ हजार ६१६ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक १ हजार २००, लोणावळा येथे ७८९, तर वडगाव येथे रुग्णसंख्या २२९ एवढी झाली आहे. आत्तापपर्यंत १२५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ हजार ६६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी ७५ जणांना घरी सोडण्यात आले.

सध्या तालुक्यात १ हजार ४३ सक्रिय रुग्ण असून त्यातील ६३१ लक्षणे असलेले तर ४१२ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ६३१ जणांमध्ये ५०३ जणांमध्ये सौम्य तर १२५ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तीन जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या १ हजार ४३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण ठरवा, ठाकरे गटाची मागणी

स्टार प्रवाहने केली एक दोन नाही तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा; २ कार्यक्रमही सोबतीला, ही आहेत नाव आणि कलाकार

Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Latest Marathi News Live Update : पुण्यातील विषारी दारु प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

SCROLL FOR NEXT