Usha-Dhore
Usha-Dhore 
पुणे

काळजे, जाधव यांचा कित्ता गिरवताहेत उषा ढोरे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहराचा प्रथम नागरिक, अशी महापौरांची ओळख. मात्र, गेल्या काही वर्षांत झालेल्या महापौरांनी प्रथम स्वतःच्या वॉर्डातील विकासकामांना प्राधान्य दिल्याचे दिसते. नितीन काळजे व राहुल जाधव यांची नावे प्राधान्याने घ्यावी लागतील. कारण, त्यांच्याच काळात अनुक्रमे चऱ्होली व चिखली-जाधववाडी भागात सर्वाधिक विकासकामे झाली आहेत. हाच कित्ता विद्यमान महापौर उषा ढोरे यासुद्धा गिरवीत आहेत. गेल्या १५ दिवसांत त्यांनी स्वतःच्या वॉर्डातील प्रश्‍नांसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत दोन बैठका घेतल्या आहेत.

महापौरपदी विराजमान झालेली व्यक्ती संपूर्ण शहराचे प्रतिनिधित्व करते. मात्र, महापालिकेत २०१७ मध्ये सत्तांतर झाले; तेव्हापासून झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या महापौरांनी स्वतःच्या वॉर्डांना प्राधान्य दिले आहे. यातील दोन माजी महापौर १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यात चऱ्होलीचे काळजे, चिखली-जाधववाडीचे जाधव यांचा समावेश आहे. समाविष्ट झाल्यापासून ही गावे जणू दुर्लक्षितच होती. मात्र, काळजे महापौर झाल्यानंतर रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले. लोहगाव व मरकळ एमआयडीसी यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची उभारणी केली. त्यामुळे वाड्या-वस्त्या जोडल्या गेल्या. नगर योजना (टीपी स्कीम) राबविण्याला प्राधान्य दिले. इंद्रायणी नदीकाठची स्मशानभूमीची नव्याने उभारणी केली. काळजे यांच्यानंतर भाजपने जाधव यांना महापौरपदाची संधी दिली. त्यांनीही अगोदर स्वतःच्या चिखली, जाधववाडीसह अन्य समाविष्ट गावांतील रस्ते विकासाला प्राधान्य दिले. याअंतर्गत सुमारे ४२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. 

इंद्रायणी नदीप्रदूषणाच्या मुक्तीसाठी ‘नमामि इंद्रायणी’ प्रकल्पाचे भूमिपूजन केले. २०१५ पासून रखडलेल्या चिखलीतील ‘जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारणीला मुहूर्त मिळाला. शाळेसाठी आरक्षित जागा ताब्यात मिळाली. पाण्याची टाकी, राजे शिवाजीनगर प्रवेशद्वार, मैलाशुद्धीकरण केंद्र, अग्निशामक केंद्र, विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या नामफलकांचे उद्‌घाटन झाले. आंद्रा, भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू झाले. कुदळवाडी, जाधववाडी, चिखली परिसरातील शाळा, विकासकामांची अधिकाऱ्यांसोबत नियमित पाहणी केली. मोशी-चिखली शिवेवरील रस्त्यासह अन्य डीपी रस्त्यांची कामे सुरू झाली. प्रभागातील मैदाने, उद्याने, व्यायामशाळांसाठीच्या आरक्षणांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जाधववाडी, कुदळवाडीमधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व विकसित करण्यावर भर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT