Pune-University
Pune-University 
पुणे

पुणे विद्यापीठात बनावट गुणपत्रिकेद्वारे ‘एमबीए’ला प्रवेश

ब्रिजमोहन पाटील

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागातून (पुम्बा) ‘एमबीए’ करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घेऊन सर्वोत्तम गुण मिळाल्यावर प्रवेश मिळतो. मात्र, ‘एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन्स’ (ATMA) या प्रवेश परीक्षेची बनावट गुणपत्रिका सादर करून चार परप्रांतीय विद्यार्थ्यांनी ‘पुम्बा’मध्ये प्रवेश घेतल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला, तर एकाने अशाच पद्धतीने इंदिरा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाने विद्यापीठाला दिले आहेत.

‘एमबीए’साठी महाराष्ट्रात ‘सीईटी’ तसेच राष्ट्रीय पातळीवर ‘एटीएमए’ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी जास्तीत जास्त गुणांची गरज असते. २०१८-१९ मध्ये ‘पुम्बा’च्या प्रवेशासाठी १२८ चा कटऑफ जाहीर केला होता. यामध्ये चार विद्यार्थ्यांनी ‘एटीएमए’च्या आधारे प्रवेश घेतला होता. हे विद्यार्थी सध्या एमबीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. 

२०१८-१९ ची प्रवेशप्रक्रिया पार पडल्यानंतर ‘एटीएमए’चे आयोजन करणाऱ्या असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल या संस्थेद्वारे प्रवेश घेतलेल्यांची पडताळणी केली, त्यामध्ये प्रवेश परीक्षा न दिलेल्यांनी प्रवेश घेतल्याचे समोर आले. तपासणीत ‘पुम्बा’ व ‘इंदिरा इन्स्टिट्यूट’मध्ये प्रवेश घेतलेल्या पाच बनावट गुणपत्रिका सादर केल्या होत्या. त्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे तंत्रशिक्षणचे पुणे विभागाचे प्र. सहसंचालक  डॉ. दि. रा. नंदनवार यांना पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिले. नंदनवार यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रमुुखांना व इंदिरा इन्स्टिट्यूटलाही पत्र लिहून विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावेत व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी सूचना दिली आहे.

‘एटीएमए’ या प्रवेश परीक्षेची बनावट गुणपत्रिका सादर करून ‘पुम्बा’मध्ये चौघांनी, तर इंदिरा इस्टिट्यूटमध्ये एकाने अशी पाच जणांनी फसवणूक करून प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांवरील कारवाईसाठी दोन्ही संस्थांना पत्र पाठविले आहे.
- डॉ. दि. रा. नंदनवार, प्र. सहसंचालक, तंत्र शिक्षण विभाग, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT