BJP Rajya Sabha MP Medha Kulkarni being admitted to a Pune hospital after sudden health complications.

 
ESakal
पुणे

Medha Kulkarni Hospitalized : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रूग्णालयात दाखल ; काही दिवस संपर्कात नसणार!

BJP MP Medha Kulkarni Health Update : सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे माहिती, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत?

Mayur Ratnaparkhe

Medha Kulkarni Admitted to Hospital in Pune : पुण्यातील भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मेधा कुलकर्णी यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तसेच, प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू, असं खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.

मेधा कुलकर्णींनी नेमकं काय म्हणाल्या आहेत ? –

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे काही दिवस आपल्या संपर्कात नसेन. त्याबद्दल दिलगीर आहे. काही काम असल्यास आपण माझ्या कार्यालयाशी संपर्क करू शकता. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू.

मेधा कुलकर्णी यांना नेमका काय त्रास होत आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू असे सांगितल्याने, त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशी त्यांचे समर्थक कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्यात नमाज पठणा झाल्याचे समोर आल्यानंतर याविरोधात मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक आंदोलन केले होते. यामुळे मोठे वादंगही निर्माण झाले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा हे देखील रूग्णालयात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT