exam 
पुणे

वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा 15 जूनपासून 

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 ते 22 जून या कालावधीत घेणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले आहे. 

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रासाठी एम.डी., एम.एस., डिप्लोमा, एम.एस्सी या अभ्यासक्रमांसाठी 12 मे पासून पुढे परीक्षा घेणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. परंतु, सद्य: परिस्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचनांप्रमाणे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गास अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून रूग्णसेवेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची मदत होणार आहे. या अनुषंगाने मे महिन्यातील सत्र परीक्षा पुढे ढकलली असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. तसेच, विद्यापीठाने सत्र-दोनच्या उन्हाळी परीक्षेसाठी विनाविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी 5 मे पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. विलंब शुल्कसह 8 मे आणि अतिविलंब शुल्कासह 12 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 

सुधारित वेळापत्रकानुसार अशी होईल परीक्षा : 
पेपर : तारीख 
पेपर- 1 : 15 जून 2020 
पेपर- 2 : 17 जून 
पेपर- 3 : 19 जून 
पेपर- 4 : 22 जून 
(वेळ : सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत) 
* अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.muhs.ac.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT