पुणे

पुण्यातील मेडिकल स्टोअर चोरट्यांच्या रडारवर, कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे ः शहरातील सर्वच व्यवसाय सध्या जेमतेम सुरू आहेत. मात्र मेडिकल चालकांचा धंदा जोरात आहे. त्यामुळे त्याच्याकडे दररोज मोठी रोकड जमा झालेली असते. संध्याकाळी मेडिकल बंद करण्यापूर्वी तेथे चोरी केली तर मोठी रक्कम हाती लागेल. त्यामुळे रात्रीच्या वेळी मेडीकलमध्ये चोरी केली, अशी कबुली चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मेडिकल दुकानात जबरी चोरी करणा-या चोरट्याने दिली आहे.

या चोरट्याने आपल्या दोन साथीदारांसह रविवारी (ता. 13) बालेवाडीतील साई चौकाजवळ असलेल्या एका मेडिकलमध्ये जबरी चोरी करीत 23 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. त्यात दिवसभर झालेल्या व्यवसायाची 18 हजारांची रोकड होती. बालेवाडीत झालेल्या घटनेप्रमाणे शहरात इतर ठिकाणी देखील चोरीचे असेच काही प्रकार घडले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील उद्योग-व्यवसाय व दुकाने सुरू झाले असले तरी त्यांची रोजची उलाढाल 100 टक्‍क्‍यांपर्यंत आलेली नाही. या सर्वांना मेडिकल व्यावसायिक काहीसे अपवाद ठरले आहे. नागरिकांची आरोग्यविषयक खबरदारी वाढल्याने व कोरोनापासून बचाव होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या वैद्यकीय वस्तूची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मेडिकल व्यावसायिकांचा व्यवसाय काहीसा वाढला असल्याचे चित्र आहे.

त्याचाच फायदा घेत आता चोरट्यांनी त्यांचा मोर्चा औषध विक्री करणा-या व्यावसायिकांकडे वळवला आहे. धंदा वाढल्याने या व्यावसायिकांकडे दररोज मोठी रक्कम जमा होत असेल. संध्याकाळच्या वेळी तेथे चोरी केली तर मोठे घबाड हाती लागेल या उद्देशातून मेडिकलमधील चो-यांचा आकडा वाढला आहे. एक एप्रिलरोजी पिंपरीत चार मेडिकल दुकाने फोडण्यात आली होती. चाकण येथे देखील नुकताच असाच प्रकार घडला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्दळ नसलेली दुकाने लक्ष-
शहरासह उपनगरांतील अनेक मेडिकल दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे जास्त वर्दळ नसलेले व रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दुकानांवर चोरट्यांची नजर असल्याचे आत्तापर्यंतच्या गुन्ह्यांतून दिसून आले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात गल्ला जमा झाला असेल या उद्देशाने चोरट्यांनी तेथे चोरी केली. दिवसभराच्या व्यवहारातून जमा झालेली रक्कम मिळावी व पळून जाणे सोपे व्हावे म्हणून चोरट्यांनी रात्रीची वेळ निवडली होती. -मोहन जाधव, पोलिस उपनिरीक्षक चतुःश्रृंगी पोलिस ठाणे

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT