Pune_Market_Yard
Pune_Market_Yard 
पुणे

पुणे : निवडणूक घ्या!; कोरोनाचा हाहाकार सुरू असताना कोणी केली ही मागणी?

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या कार्यकारिणीची मुदत संपलेली आहे. या पदाधिकाऱ्यांचा विहित कालावधी संपलेला आहे. त्यामुळे बाजारातील बहुतांश सभासदांनी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. आता अडते असोसिएशन पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्व अडत्यांचे लक्ष लागले आहे. 

अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्या पदाधिकाऱ्यांची मुदत १५ जून रोजी संपली. ही मुदत संपल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक घ्यावी की पुढे ढकलावी यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु, निवडणूक घेतल्या जाव्या यासाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
 
पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यामुळे असोसिएशनने सर्वसाधारण सभा घेऊन पुढील भूमिका घेतली पाहिजे. अडत्यांची निवडणूक घेण्याची इच्छा असली तरी सर्वानुमते निर्णय व्हावा, असे अडते करण जाधव म्हणाले.

सध्याच्या परिस्थितीत निवडणुक लांबविण्याबाबत संबंधित संस्थांनी घटनेतील तरतुद पाहून सर्वसाधारण सभा घेऊन तसा निर्णय घेतला पाहिजे. लॉकडाऊनमध्ये संस्थाच्या निवडणुकांना कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मुदत संपल्यानंतर संबंधित ट्रस्टने आपल्या घटनेतील तरतुदींप्रमाणे निवडणुक घेणे बंधनकारक आहे. 
- दिलीप देशमुख, धर्मादाय सहआयुक्त. 

साधारणतः आठ दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे पत्र दिले आहे. अडते असोसिएशनच्या घटनेतील तरतुदींनुसार निवडणुक प्रक्रियेबाबत कार्यवाही केली जाईल. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून शासन जो आदेश देईल, त्यानुसार निवडणुक घेणार आहेत. 
- विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन.

निवडणूक घेण्याची मागणी बहुतांश सभासदांची आहे. असोसिएशनच्या सभासदांची संख्या मर्यादित असल्याने निवडणूक घेणे शक्य आहे.  याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
- बापू भोसले, अडते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT