पुणे

सीआयडी आणि भारती विद्यापीठ यांच्यात रेखाचित्र प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार

विनायक होगाडे

पुणे : विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी महत्वपुर्ण ठरणारे रेखाचित्र काढण्याचे प्रशिक्षणासाठी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) व भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. राज्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त सुबोध कुमार जायसवाल यांच्या आदेशानुसार "सीआयडी'चे अतिरीक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी "सीआयडी'मध्ये खास रेखाचित्र कक्षाची स्थापना केली. त्याअंतर्गत पहिल्या तुकडीतील 18 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय प्रशिक्षण पुर्ण होऊन त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्रही देण्यात आले.

गुन्ह्यातील संशयित आरोपींची ओळख पटविण्यासाठी व त्यांना अटक करण्यासाठी महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना आवश्‍यक असलेली रेखाचित्रे विनामोबदला काढून देण्याचे काम भारती विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.गिरीष चरवड हे 28 वर्षांपासून करीत आहेत. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी रेखाचित्र या विषयातील पहिली डॉक्‍टरेट असलेले डॉ.चरवड यांची नेमणूक केलेली आहे. त्यांना या प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देणे आणि आवश्‍यकतेप्रमाणे रेखाचित्र काढून देण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व भारती विद्यापीठ यांच्यात मंगळवारी सदाशिव पेठेतील भारती भवन येथे सामंजस्य करार झाला. भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि सहकार राज्यमंत्री डॉ.विश्‍वजीत कदम यांच्या आदेशानुसार हा सामंजस्य करार संपन्न झाला.

यावेळी अतुलचंद्र कुलकर्णी, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलिस उपअधिक्षक संभाजी कदम, अनुजा देशमाने, पोलिस निरीक्षक अमोल गवळी, समन्वयक समीर धर्माधिकारी, भारती विद्यापीठाचे डॉ.के.डी.जाधव, डॉ.महादेव सगरे, जे.जयकुमार, हनुमंत मुळावडे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या प्राचार्य अनुपमा पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT