Rape Victim
Rape Victim sakal
पुणे

बलात्कारग्रस्तांचे होणार मानसिक संगोपन

सुनील गाडेकर

पुणे : बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना दूर करीत त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, तसेच त्यांना व त्या घटनेतील साथीदारांना कायदेविषयक मदत करण्यासाठी सहयोग ट्रस्टतर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ सुरु करण्यात आले आहे.

बलात्कारासह जगणाऱ्यांना त्यांचे दुखः व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून ‘सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. रमा सरोदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सुरेखा दास, रेश्मा गोखले, गौरांगी ताजणे, अॅड.अजित देशपांडे, अॅड.अक्षय देसाई, शार्दूल सहारे, तृणाल टोणपे यावेळी हजर होते.

सेंटरबाबत अॅड. सरोदे यांनी सांगितले की, मायग्रोथ झोन ही कंपनी न्युरोलिंगविस्टिक तंत्रावर काम करते. त्यांच्यातर्फे प्रशिक्षित व्यक्तीद्वारे बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मोफत मदत करण्यात येणार आहे. मायग्रोथ झोनसोबत सहयोग ट्रस्ट सहकाऱ्याच्या भावनेतून बालात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना, आपल्या हातून पाप घडले व आपलीच चूक आहे, अशी स्वतःलाच दोष देणारी भावना, मनातील भीती, राग या संदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी काम करणार आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार -

- २०१९ साली देशात बलात्काराच्या ३२, ५५९ घटना

- म्हणजे दररोज ८८ बलात्कार होतात

- राज्यात २०१९ साली बलात्काराचे २,२९९ गुन्हे

"ज्या महिलांवर अत्याचार झालेले असतात त्यांनी जणू स्वतःच काही चूक केली आहे, असा दबाव घेऊन त्या जगात असतात. त्यामुळे त्यांच्या मनातील ताणतणाव एकमेकांसोबत संवाद साधण्यातून कमी करण्याचा प्रयत्न ‘सपोर्ट ग्रुप’ करेल. यातूनच बलात्काराचे प्रकरणे भीतीचे दडपण न बाळगता लढण्याची हिंमत या स्त्रियांमध्ये निर्माण होईल आणि त्या सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील."-अॅड. रमा सरोदे, सचिव, सहयोग ट्रस्ट

येथे करा संपर्क :

असीम सरोदे आणि असोसिएट्स, फ्लॅट क्रमांक १, प्रथमेश सीएचएस, लेन क्रमांक ५, प्रभात रोड, डेक्कन जिमखाना, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT