Mercedes car caught fire on the road near palase village in pune 
पुणे

अन् भर रस्त्यात मर्सिडीज कार आगीत जळून खाक 

सकाळ वृत्तसेवा

माले : मुळशी धरण भागातील पळसे (ता. मुळशी) येथे चालू मर्सिडीज कारला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली.  वेळीच आग लागल्याचे लक्षात आल्याने आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. याबाबत वाहनमालक नवनाथ लक्ष्मण हुंडारे, (रा. लवळे फाटा, पिरंगुट, ता. मुळशी) यांनी पोलिसांत खबर दिली आहे. 

रशियन वैमानिकांनी पुण्यात उडविले सुखोई 30

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी नवनाथ हुंडारे हे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांच्या मर्सिडीज कारने पळसे येथे गेले होते. रात्री दहाच्या दरम्यान घरी परतत होते. पळसे गावापासून काही अंतरावर आल्यानंतर त्यांना अचानक मर्सिडीज कारच्या पुढील बाजुने धुर येताना दिसला. त्यामुळे त्यांनी व त्यांचा भाऊ नंदकिशोर यांनी खाली उतरुन पाहिले असता, त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते दोघेही तातडीने गाडी बाहेर उतरले. काही वेळात चारचाकीने मोठा पेट घेतला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

दरम्यान, पीएमआरडीएच्या मारुंजी येथील अग्निशमन विभागाचे उपस्थानक अधिकारी विजय महाजन, चालक संदिप शेळके, फायरमन योगेश मायनाळे, अक्षय तांबे, प्रकाश मदन वैभव कोरडे यांनी घटनास्थळी धाव घेवून आग शमविली. या आगीत चारचाकीचे मोठे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT