The message that went viral in the name of the district collector in pune is a fake 
पुणे

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे वायरल झालेला तो मेसेजही फेकच

अनिल सावळे

पुणे : जिल्ह्यात लॉकडाऊन असताना व्हाट्सअप आणि सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत. परंतु अशा खोट्या मेसेजवर आळा घालण्यास जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊन कालावधीत हे बंद राहणार, ते सुरू राहणार... अशा आशयाचे मेसेज जिल्हाधिकारी यांच्या नावाखाली व्हाट्सअप आणि सोशल मीडियावर फिरत आहेत. यापूर्वीही अनेकदा खोटे मेसेज वायरल झाल्यानंतर त्याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खोटे मेसेज वायरल करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. पोलिस प्रशासनाकडून याबाबत चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज व्हायरल करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. 

स्वतःला सावरत, धीर देत त्यांनी केली आत्मविश्‍सासाने कोरोनावर मात

'सर्व दुकाने सुरू होतील, सरकारी कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक, जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही, सोमवार ते रविवार याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस सकाळी 10 ते 4 दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा, दररोज सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी, व्यायामशाळा बंद, पण शारीरिक अंतर राखून व्यायामास परवानगी,  शीतपेयांची दुकाने, चहा टपरी, पानठेल्यांना हिरवा कंदील...' अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. अशा खोट्या मेसेजला नागरिकही कंटाळले असून, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा आणि पोलिस प्रशासन संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करणार का, असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

अरे देवा! पुणे महापालिकेचा आरोग्य विभागच पडला आजारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT