Metro-Work 
पुणे

मेट्रोचे भुयार पोचले शिवाजीनगर एसटी स्थानकापर्यंत!

सकाळवृत्तसेवा

पुणे - पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गावर भुयारी मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. कृषी महाविद्यालयाच्या आवारातून सुरू झालेले भुयारी मेट्रोचे काम आता शिवाजीनगर एसटी स्थानकापर्यंत पोचले आहे. दोन टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) मेट्रोसाठी भुयार खोदण्यात येत आहे. 

पिंपरी - स्वारगेट या सुमारे १६ किलोमीटरच्या मार्गावर कृषी महाविद्यालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या आवारातून स्वारगेटच्या दिशेने जाण्यासाठी दोन बोगदे खोदण्यात येत आहेत. एक बोगदा सुमारे ५०० मीटर, तर दुसरा बोगदा सुमारे ७०० मीटरपर्यंत खोदून झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भुयारी मेट्रोच्या कामाला प्रारंभ झाला आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारात आता मेट्रोसाठीच्या कामाला वेग आला आहे. कृषी महाविद्यालय ते एसटी स्थानक दरम्यान बोगदा जवळजवळ पूर्ण होत आहे. आता तेथून स्वारगेटच्या दिशेने बोगद्याचे खोदकाम सुरू होईल.

जमिनीपासून सुमारे १२ ते १५ मीटर खोलवर भुयार खोदण्यात येत आहे. त्याचा व्यास सुमारे ६ मीटरचा आहे. त्यातून दोन ट्यूबचे काम सुरू आहे. स्वारगेटकडे जाणाऱ्या, तर स्वारगेटकडून येणाऱ्या मेट्रोसाठी दोन्ही ट्यूब आहेत. भुयारी मेट्रोसाठी दोन ‘टीबीएम’वर प्रत्येकी १६ कर्मचारी काम करीत आहेत, अशी माहिती मेट्रोचे जनसंपर्क विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोचे बहुमजली स्थानक होणार आहे, त्याचे काम सुरू झाल्यामुळे एसटी स्थानक पुणे - मुंबई रस्त्यावर मुळा रस्त्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे. तर, डेपोही तीन दिवसांपूर्वी हलविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT