Metro work in Pune and Pimpri Chinchwad speeds up by 40 percent 
पुणे

मेट्रोच्या कामाला पुन्हा गती; 'या' राज्यातून परत आले मजूर

सकाळवृत्तसेवा

पुणे : अर्थव्यवस्थेचे चक्र फिरू लागल्यामुळे मेट्रो प्रकल्पावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. परराज्यात गेलेले मजूर परतू लागल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे काम आता जोर धरू लागले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात महामेट्रोचे काम बंद होते. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. दरम्यानच्या काळात श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू झाली. त्यातून महामेट्रोचे सुमारे 1200 हून अधिक मजूर पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यांत रवाना झाले होते. मात्र, आता काही प्रमाणात मजूर परतू लागले आहेत. दोनच दिवसांपूर्वी महामेट्रोचे सुमारे 200 मजूर परतले आहेत. तसेच झारखंडसह तीन राज्यांत महामेट्रोने बस पाठविल्या आहेत. त्यातून मजूर टप्प्याटप्प्याने पुण्याकडे परतू लागले आहेत. पुढील दोन आठवड्यांत आणखी 300 ते 400 मजूर परततील, असा अंदाज महामेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक हेमंत सोनवणे यांनी वर्तविला. शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या क्षमतेच्या सुमारे 40 टक्के सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
----------------
जिओमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक; आता कोणी केली गुंतवणूक?
----------------
चांगली बातमी : भारतात कोरोनावरील दुसरी लसही विकसित
---------------- 
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय हे मार्ग सुरू होणार आहेत. हे दोन्ही मार्ग अनुक्रमे 5. 5 आणि 5 किलोमीटर अंतराचे आहेत. त्यावर पिंपरी, फुगेवाडी, वनाज, गरवारे महाविद्यालय ही स्थानके असतील. त्यासाठीच्या कामावर उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे सध्या भर देण्यात येत आहेत, असेही सोनवणे यांनी नमूद केले. 

शहरातील मेट्रोच्या कामावर दृष्टिक्षेप 
- मेट्रोचे नदीपात्रात एऱंडवणे तसेच येरवडा परिसरात काम सुरू आहे
- भुयारी मेट्रोसाठी सुमारे 1200 मीटरचा बोगदा खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे 
- स्वारगेट येथील ट्रान्स्पोर्ट हबमध्ये अल्पावधीतच टनेल बोअरींग मशीन कार्यान्वित होईल. त्यासाठीची सध्या तयारी सुरू आहे. 
- कोथरूड डेपो येथील मेट्रोच्या डेपोच्या कामानेही वेग घेतला आहे
- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोसाठी खांब उभारण्याचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT