MDH26B05100 - संजयमामा शिंदे
MDH26B05101 - रणजितसिंह शिंदे
MDH26B05099 - पंडित देशमुख
MDH26B05103- प्रा. आशिष रजपूत
माढा पंचायत समिती शिंदे कुटुंबीयांनी राखली
पंडित देशमुख सभापतिपदाचे तर प्रा.डॉ. आशिष रजपूत उपसभापतिपदाचे दावेदार
माढा, ता. १० : माढा तालुका पंचायत समितीमध्ये शिंदे कुटुंबीयांनी निर्विवाद सत्ता राखली असून, पंचायत समितीच्या सभापती पदासाठी मानेगाव गणातून विजयी झालेले पंडित देशमुख तर भोसरे गणातून विजयी झालेले प्रा. आशिष रजपूत यांची उपसभापतीपदी दावेदारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
माढा तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे व भाजप नेते रणजितसिंह शिंदे यांनी आखलेली रणनीती यशस्वी झाली. शिंदे कुटुंबीयांना मानणाऱ्या अकरा उमेदवारांना पंचायत समिती सदस्य करण्यात यश आले.
करमाळा मतदारसंघातील भोसरे, रोपळे (क), कुर्डू, अकोले खुर्द या चार गणांतून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. जिल्हा परिषदेच्या भोसरे व कुर्डू गटातही याच पद्धतीने निवडणूक लढवली आणि या ठिकाणचे दोन्ही गट आणि चार गण शिंदेंनी राखले.
दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघातील १० गणांमध्ये रणजितसिंह शिंदे यांनी राजकारणातले पारंपरिक विरोधक असलेले सावंत व साठे कुटुंबीयांना सोबत घेतले आणि बेरजेचे राजकारण केले. रणजितसिंह शिंदे यांची ही खेळीही यशस्वी ठरली.
या मतदारसंघातील मानेगाव, उपळाई बुद्रूक, लऊळ, टेंभुर्णी, रांझणी, पिंपळनेर या गणांतून कमळ चिन्हावर सहा पंचायत समिती विजयी झाले. भुताष्टे गणातून मतविभागणी टाळण्यासाठी भाजपचे उमेदवार योगेश पाटील यांची शिष्टाई करून उमेदवारी मागे घेत स्वाती गिड्डे यांना भाजप पुरस्कृत करून उमेदवारी दिल्याची डावही यशस्वी झाला.
बेंबळे गटात मात्र शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्या पत्नी सविता कोकाटे विजयी झाल्या. संजय कोकाटेंच्या या मतदारसंघात असलेला संपर्कामुळे हा विजय मिळाला. बेंबळे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पोपट अनपट विजयी झाले तर तर मोडनिंब गणातून आमदार अभिजित पाटील समर्थक प्राजक्ता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विजयी झाल्या.
सध्या माढा तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या व उपसभापतिपदाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. माढा तालुक्यातील पूर्व भागामध्ये भाजप ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असून, आमदार अभिजित पाटील यांना या निवडणुकीत शह देण्यामध्ये भाजप यशस्वी झाले आहे. त्यामुळे या भागातून सभापतिपदासाठी मानेगाव गणातील पंडित देशमुख यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. राजकीय समतोल राखण्यासाठी करमाळा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गणातील पंचायत समिती सदस्यांना उपसभापतिपदाची संधी दिली जाऊ शकते. उच्चशिक्षित व पंचायत समिती कारभारातील अनुभवी म्हणून प्रा. डॉ. आशिष राजपूत यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
कदाचित सर्व भागातील पंचायत समिती सदस्यांना रोटेशन पद्धतीनेही सभापतिपद व उपसभापतिपद दिले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
रणजितसिंह शिंदे यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी माढा तालुक्यातील पंचायत समितीची निवडणूक ठरली आहे.
माढा पंचायत समितीमधील पक्षीय बलाबल
पंचायत समिती सभापतिपद - सर्वसाधारण
माढा पंचायत समिती १४ जागा
भाजप ६
भाजप पुरस्कृत १
राष्ट्रवादी काँग्रेस संजयमामा समर्थक ४
राष्ट्रवादी काँग्रेस अभिजित पाटील समर्थक १
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १
अपक्ष १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.