corona1 
पुणे

पुण्यातील या ग्रामपंचायतींनी कोरोनाला रोखण्यासाठी आखलाय असा प्लॅन

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायती पुढील दहा दिवसांत कोरोना मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांच्या मदतीने प्रभागनिहाय कोरोनामुक्तीचे माय़क्रो प्लॅनिंग सुरु केले आहे. 

आरोग्य विभागाने तयार केलेल्या मायक्रो माय़क्रो प्लॅनिंग अंतर्गत प्रभागनिहाय शंभर टक्के कुटुंबांचे व कुटुंबांतील सदस्यांचे सर्वेक्षण, सर्दी- खोकला- ताप अशी लक्षणे असणारे रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व मित्रमंडळी अशा सर्वांचीच यादी तयार करणे, कोरोनाबाधित रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेल्याना कोविड केअर सेंटरपर्यंत पोचवणे, आदी कामे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांच्या मदतीने केली जाणार आहेत. 

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत मागिल पंधरा दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या प्रार्श्वभूमीवर वरील दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व या पुढील काळात रूग्णांची वाढ होऊ नये, यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत आरोग्य विभागाने कदमवाकवस्ती येथील मधुबन मंगल कार्यालयात दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक व ग्रामपंचायत प्रशासनाची बैठक बोलवली होती. या वेळी डॉ. जाधव यांनी वरील नियोजन सादर केले. या वेळी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांत नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या वेळी हवेली पंचायत समिती उपसभापती युगंधर काळभोर, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, तलाठी दादासाहेब झांजे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय पवार, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाबासाहेब काळभोर, लोणी काळभोरचे उपसरपंच राजाराम काळभोर आणि अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते. 

या वेळी डॉ. जाधव म्हणाले की, या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत वॉर्डनिहाय कुटुंब सर्वेक्षणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सर्वेक्षणात एखाद्या कुटुंबातील व्यक्तीस सर्दी, खोकला व ताप असेल, तर तत्काळ त्यांस व कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तसेच, सर्वांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रादुर्भाव फैलावावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीस प्रत्येकाने खरी माहिती देऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच सर्वच नागरिकांनी आपापल्या प्रभागातील एखाद्या व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप असल्याचे निदर्शनास आल्यास, संशयित रुग्ण व त्यांचे कुटुंबातील सर्वांना तत्काळ कोरोना सेंटरमध्ये पाठवून द्यावे. यामध्ये काही अडचण आली तर आरोग्य विभागासी संपर्क साधावा. 

कोरोना मुक्तीसाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन मागिल तीन महिन्यांपासून चोविस तास काम करत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांनी मनात आणल्याशिवाय व योग्य ती काळजी घेतल्याशिवाय कोरोनाची साथ आटोक्यात येऊच शकत नाही. नागरिकांनी या पुढील काळात मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे,  अशा उपाय योजनांबरोबर, आपल्या आसपास वावरणाऱ्या कोरोनाबाधित रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची माहिती ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाला तत्काळ देण्याची गरज आहे. नागरिकांनी सक्रीय सहभाग घेतल्याशिवाय कोरोनामुक्ती होऊच शकत नाही
 - युगंधर काळभोर, उपसभापती, हवेली पंचायत समिती 
 
Edited By : Nilesh J shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT