पुणे

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले डाॅ. आंबेडकर यांना अभिवादन

डॉ. संदेश शहा

इंदापूर : येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील जेतवन बुद्ध विहारात ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिवादन केले. यानिमित्त सामूहिक पंचशील व त्रिशरण घेऊन धम्मपुजा करण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरुवातीला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रभाग नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे यांनी पुष्पहार अर्पण केला.

पीआरपीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिप प्रज्वलन करून गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केली.  याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, प्रा. बाळासाहेब मखरे, प्रा. अशोक मखरे, सुधीर मखरे, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे, शशिकांत मखरे, महादेव लोखंडे, वसिम बागवान, मुकुंद साळुंखे, खाजाभाई बागवान, विजय शिंदे, रमेश शिंदे, शिवाजी मखरे, शुभम मखरे, विशाल जगताप, धनंजय तांबिले, परमेश्वर कांबळे, विकास साबळे, विशाल मखरे, पांडुरंग मखरे, गौतम मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT