ministers nephew car hits municipal employees in pune 
पुणे

पुणे : मंत्र्याच्या पुतण्याची कार, पालिका कर्मचाऱ्याला धडकली; पोलिसांच्या मेहरबानीने सुटका

सकाळवृत्तसेवा

पुणे : धनकवडी येथील शंकर महाराज मठाजवळच्या उड्डाण पुलावर एका भरधाव कारने दुचाकीवरुन जाणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला उडविले. अपघातानंतर कारचालकाने तेथुन पळ काढला. दरम्यान संबंधीत कारचालक राज्याच्या एका मंत्री महोदयाचा पुतण्या असून सहकारनगर पोलिसांच्या मेहेरबानीने त्यास केवळ 'समजपत्र' देऊन सोडुन दिल्याची माहिती पुढे आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दादासाहेब पुजारी असे अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव आहे. पुजारी हे पुणे महापालिकेच्या वाहन विभागामध्ये काम करतात. कोरोना रुग्णलयांच्या रुग्णवाहीकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने एक पथक तयार केले आहे. त्यामध्ये पुजारी कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजता ते व त्यांचे सहकारी धनकवडी येथील कोवीड सेंटरला भेट द्यायला जात होते. धनकवडी येथील शंकर महाराज मठासमोरच्या उड्डाण पुलावरुन ते जात असताना एका भरधाव आलिशान कारने  त्यांच्या दुचाकीला पाठीमागुन धडक दिली. त्यावेळी पुजारी व त्यांचे सहकारी खाली पडले. दोघाना गंभीर दुखापत झाली. पुजारी यांचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णलयात दाखल केले.

दरम्यान, सहकारनगर पोलिसांनी संबंधीत कार ताब्यात घेतली, मात्र वरच्या पातळीवरुन सूत्रे हलल्यानंतर पोलिसांनी कारचालक पुतण्यावर मेहेरबानी दाखवित कारचालकाला केवळ समजपत्र देऊन सोडून देण्यात आले. तसेच पोलिसांनी याबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI in Agriculture : ‘एल निनो’च्या मुकाबल्यासाठी ‘एआय’ची मदत, ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून सूचना

Maharashtra Finance Ministry : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे? पावसाळी अधिवेशनाआधी निर्णय होणार? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...

Pune Water Supply: पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणी; महापौरांच्या बैठकीत निर्णय, घटत्या पाणीसाठ्यामुळे पाऊल

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी अपडेट! कर्जमाफीची प्रक्रिया सुरू: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अंतर्गत मतभेदांमुळे ‘इंडिया’चे नेते अस्वस्थ

Trinamool Congress: ‘तृणमूल’मधील फुटीचे लोण दिल्लीपर्यंत; वीस खासदारांचा वेगळा गट, ‘एनडीए’ला पाठिंब्यासाठी पत्र

SCROLL FOR NEXT