Digital_Education
Digital_Education 
पुणे

शैक्षणिक धोरण २०२० : 'ऑनलाईन एज्युकेशन'साठी शिक्षण मंत्रालयात हालचाली!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे देशभरात सध्या विविध पातळ्यांवर ऑनलाईन शिक्षण दिले जात असले, तरीही भविष्याच्या पाऊलखुणा ओळखत नव्या शैक्षणिक धोरणात 'डिजीटल'माध्यमावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयात डिजिटल (ऑनलाईन) शिक्षणासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्याचे नियोजन आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण मंत्रालयात 'ऑनलाईन' शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची आणखी करण्यात आली आहे. तसेच डिजिटल शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, साहित्य निर्मिती, विविध बदलांनुसार शिक्षण तंत्रात बदल यासंदर्भात पावले उचलली जाणार आहेत. तंत्रज्ञानात सातत्याने होणोर बदल लक्षात घेऊन, या विभागामार्फत ऑनलाईन शिक्षण प्रणालीत आवश्‍यक बदल करण्यात येतील. शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे ई-साहित्य निर्मिती केली जाणार आहे.

शिक्षणाच्या विविध टप्प्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा साहित्य, पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, व्हिडिओ, अध्ययन-अध्यापन साहित्य असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ई-साहित्य सहज उपलब्ध व्हावे, म्हणून एकच 'ऑनलाईन डिजिटल भांडार' कार्यन्वित करण्याचे नियोजन आहे. हे भांडार राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय म्हणून ओळखले जाणार आहे. त्याशिवाय ऑनलाईन अभ्यासक्रमावर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दैंनदिन कामकाज सांभाळून किंवा विकेंडला ऑनलाईद्वारे सर्टिफिकेट कोर्सेस करता येणार आहेत. एकूणच नव्या शैक्षणिक धोरणात डिजिटल शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले असून त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

"नव्या शैक्षणिक धोरणाचे कायद्यात रुपांतर होऊन ते प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. देशात सध्या 'लर्न फ्रॉम होम' सुरू असून विविध शैक्षणिक संस्था, खासगी संस्था आणि विद्यापीठे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात 'ई-कन्टेंट' विकसित झाला आहे. 'स्वयंम'सारखे व्यासपीठ उपलब्ध आहेत. त्याचा वापर शिक्षणासाठी सध्या होत आहे. खरंतर शिक्षण व्यवस्था आणि उद्यो यांच्यात योग्यरित्या समन्वय साधता आला तरच, खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे. धोरणात ऑनलाईन/डिजिटल शिक्षणावर भर दिला असला, तरीही त्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा बळकट करणे आवश्‍यक असून त्यादृष्टीने पावले उचलणे अपेक्षित आहे. तसेच हे सर्व प्रत्यक्षात आणण्याचे आव्हान शिक्षण मंत्रालयासमोर असणार आहे.'' 
- दीपक शिकारपूर, संगणकतज्ज्ञ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT