Junnar_Murder 
पुणे

दारुसाठी पैसे मागितले म्हणून केला खून; तरुण बेपत्ता होण्यामागचं गूढ उकललं

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर (पुणे) : शिवली (ता. जुन्नर) येथील बेपत्ता झालेल्या आदिवासी तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे गणपत काशीनाथ आढारी (वय ३७, रा. शिवली, ता. जुन्नर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मित्रांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. या कारणावरून वाद झाला आणि दोन मित्रांनी आपल्या मित्राचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून त्याला जीवे ठार मारले.  

त्यानंतर मित्राच्या चारचाकी गाडीतून मृतदेह दुर्गम आदिवासी भागातील हातविज येथील खोल दरीमध्ये फेकून दिला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असून जुन्नर पोलिसांनी या खून प्रकरणी गणेश धर्मा मुठे (वय ३२), दीपक गेनभाऊ कोरडे (वय १९), अमोल विठ्ठल लांडे (वय २१, तिघे रा. माणकेश्वर, ता. जुन्नर) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गणपत आढारी हा मंगळवार (ता.९) पासून बेपत्ता असल्याची तक्रार जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गणपत आढारी, गणेश मुठे, दीपक कोरडे हे तिघेजण जुन्नरमधील वाईन शॉप लगत गप्पा मारीत होते. यावेळी गणपतने दारू पिण्याकरिता गणेशकडे पैसे मागितले. त्यावरून दोघात वाद झाला. त्यानंतर आपटाळे खिंडीजवळ एका शेतात गप्पा मारत असताना या तिघांत पुन्हा वाद झाल्याने गणेश आणि दीपक या दोघांनी गणपतचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून त्याला जीवे ठार मारले. त्यानंतर बुधवारी (ता.१०) अमोल लांडेच्या चारचाकीमधून गणपतचा मृतदेह हातविज येथील खोल दरीत फेकून दिला.

जुन्नर पोलिसांचे पथक तसेच लोणावळा येथील एक पथक खोल दरीत गणपतचा शोध घेत होते. दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर रविवारी (ता.१४) मृतदेह खोल दरीत मिळून आला. जुन्नर पोलिसांनी तातडीने हालचाल करून या घटनेतील तीन आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास जाधव, अंमलदार वाल्मिक शिंगोटे करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

Nashik Municipal Corporation : नाशिककरांनो सावधान! महापालिकेच्या सर्वेक्षणात दीड लाखांहून अधिक नळजोडण्या आढळल्या नियमबाह्य

Jim Corbett: जिम कॉर्बेटचा हाऊसफुल्ल! बुकिंग उघडताच काही मिनिटांत ४१ खोल्या बुक; करावी लागतेय वर्षभर प्रतीक्षा!

Ratnagiri Farmer : जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका; विचित्र; वातावरण, कमाल तापमान ३८ अंशांवर, बागायतदार चिंतेत

SCROLL FOR NEXT